कचऱ्यात सापडलेल्या बाळाला मिळणार नवं आयुष्य; अमेरिकेत CEO पदावर काम करणाऱ्या जोडप्याने घेतलं दत्तक

American Couple Adopt Lucknow Child: अमेरिकेतील एका जोडप्याने लखनऊ येथील मुलाला दत्तक घेतलं आहे. या मुलाच्या दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 7, 2025, 03:15 PM IST
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या बाळाला मिळणार नवं आयुष्य; अमेरिकेतील जोडप्याने title=
CEO of American company adopts indian child found in garbage dump

American Couple Adopt Lucknow Child: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक हृदस्पर्शी घटना समोर आली आहे. तीन वर्षांपूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक बाळ सापडलं होतं. आता त्याच बाळाचं नशीब उजळलं आहे. या बाळाचं पालनपोषण आता थेट अमेरिकेत होणार आहे. अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीच्या सीईओने त्या मुलाला दत्तक घेतलं आहे. दत्तक घेण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रशासनाची मंजूरीदेखील मिळाली आहे. आता मुलाचा पासपोर्ट बनवण्याचे काम सुरू आहे. पासपोर्ट बनवून झाल्यानंतर मुलाला आता सातासमुद्रापर्यंत शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. 

अनाथ मुलाचं नाव रोहित आहे (बदलेले नाव) तीन वर्षांपूर्वी ते एक नवजात बाळ होते. कोणीतरी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देण्यात आले होते. मात्र त्याच्या नशीबाने त्याला काही व्यक्तींनी एका अनाथश्रमात नेले. मात्र आता तिथूनच तो अमेरिकेत जाणार आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, रोहितला दत्तक घेण्यासाठी अमेरिकेतील एका कुटुंबाने अर्ज दिला होता. दत्तक घेणारे त्याचे वडील अमेरिकेतील एका कंपनीत सीईओ आहेत. 

कंपनीतील सीईओ त्यांच्या पत्नीसह अनेकदा त्यांच्या पत्नीसह लखनऊला आले होते. त्यांनी रोहितची सर्व माहिती गोळा केली आणि त्याला दत्तक घेतले. मागच्या आठवड्यात रोहितला दत्तक देण्याची सुनावणी एडीएम येथे झाले. यावेळी अमेरिकेतील जोडपंदेखील उपस्थित होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून दत्तक देण्याचे आदेशही जारी झाले आहेत. 

रोहितच्या पासपोर्टचे काम सुरू आहे. पासपोर्ट तयार झाल्यानंतर लगेचच आठवड्याभरात रोहित अमेरिकेसाठी रवाना होणार आहे. अमेरिकेच्या जोडप्याने दोन महत्त्वाच्या उद्देषाने त्याला दत्तक घेतले आहे, एक तर रोहितला कुटुंब मिळेल आणि दुसरं म्हणजे त्यांच्या मुलाला भाऊ मिळेल. रोहितला दत्तक घेतल्यांतर या जोडप्याच्या कुटुंबात एका नवीन सदस्याचे आगमन होणार आहे.