मुंबई : आज म्हणजेच 1 डिसेंबरपासून अनेक नियम बदलले गेले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. या बदलांमध्ये एलपीजी सिलिंडरची एलपीजी किंमत, होम लोन ऑफर, एसबीआय क्रेडिट कार्ड ऑफर, आधार-यूएएन लिंकिंग इत्यादींचा समावेश आहे. तसेच जिओ आणि अमेझॉन प्राईमच्या रिचार्जमध्येही वाढ झाली झाली आहे. (Changes 1 December 2021)
UAN-आधार लिंकिंग
जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN), तर 1 डिसेंबर 2021 पासून, कंपन्यांना फक्त त्या कर्मचाऱ्यांचे ECR (इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न) दाखल करण्यास सांगितले आहे ज्यांचे UAN आणि आधार लिंकिंग सत्यापित झाले आहे. जे कर्मचारी कालपर्यंत ही लिंक दाखल करू शकले नाहीत, ते ईसीआर दाखल करू शकणार नाहीत.
गृह कर्ज ऑफर
सणासुदीच्या काळात, बहुतेक बँकांनी गृहकर्जाच्या विविध ऑफर दिल्या होत्या, ज्यात प्रक्रिया शुल्क माफी आणि कमी व्याजदर यांचा समावेश होता. बहुतांश बँकांच्या ऑफर 31 डिसेंबर रोजी संपत आहेत, परंतु LIC हाउसिंग फायनान्सची ऑफर 30 नोव्हेंबरपर्यंत संपली आहे.
SBI क्रेडिट कार्ड
जर तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 1 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून SBI च्या क्रेडिट कार्डने EMI वर खरेदी करणे महाग झाले आहे. आतापर्यंत फक्त SBI कार्ड वापरल्यावर व्याज भरावे लागत होते, मात्र आता प्रोसेसिंग फी देखील भरावी लागणार आहे.
गॅस सिलेंडरची किंमत
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किमती निश्चित केल्या जातात. व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरचे नवीन दर महिन्याच्या पहिल्या दिवशी जारी केले जातात. 1 डिसेंबरला सकाळी नवे दर जारी करण्यात आले आहेत.
जीवन प्रमाणपत्र (life certificate)
जर तुम्ही देखील पेन्शनधारकांच्या श्रेणीत येत असाल आणि तुम्ही अद्याप तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर केले नसेल तर आता तुम्हाला पेन्शन मिळण्यात अडचणी येतील.
जिओच्या रिचार्जमध्ये वाढ (Jio recharge)
जिओच्या विविध प्लॅनमध्ये 31 रुपयांपासून ते 480 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. जिओ फोनसाठी खास आणलेल्या जुन्या 75 रुपयांच्या प्लॅनची नवीन किंमत आता 91 रुपये असेल. अमर्यादित 129 रुपयांच्या टॅरिफ प्लॅनसाठी आता तुम्हाला 155 रुपये मोजावे लागतील.
जिओ ग्राहकांना 1 डिसेंबरपासून जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत. एअरटेल पाठोपाठ जिओनेही आता आपल्या प्लॅनचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेझॉन प्राइम ओटीटी
अमेझॉन प्राइम या OTT प्लॅटफॉर्मवरील मनोरंजन देखील महाग होणार आहे. आपल्या FAQ पृष्ठावर याची पुष्टी करताना, कंपनीने सांगितले की पुढील महिन्यात 13 डिसेंबरपासून Amazon प्राइम सबस्क्रिप्शनसाठी अधिक पैसे लागतील.
सध्या युजर्सना वार्षिक मेंबरशिपसाठी 999 रुपये मोजावे लागतात, मात्र 13 डिसेंबरपासून युजर्सना Amazon च्या वार्षिक मेंबरशिपसाठी 1499 रुपये मोजावे लागणार आहेत, म्हणजेच यूजर्सना 500 रुपयांचा थेट झटका बसणार आहे.