Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज अशी ओळख असलेला चिनाब रेल्वे ब्रिज आता काहीच दिवसांत सुरु होणार आहे. यासाठी या ब्रिजवरुन रेल्वे इंजिनची चाचणी घेणं सुरु झालंय. त्याचाच भाग म्हणून या मार्गावर सांगलदान-रियासी लिंकची ट्रायल रन घेतली. हा ब्रिज चिनाब नदीवर तब्बल 359 मीटर उंचीवर उभारण्यात आलाय. तर या ब्रिजची मुख्य कमान 467 मीटर इतकी आहे.
पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटरहून जास्त याची उंची आहे. अतिवेगवान वारे, तसंच भूकंपरोधक अशी याची रचना आहे. आंतरराष्ट्रीय स्तराच्या वेल्डिंगचा यासाठी वापर करण्यात आलाय. या ब्रिजमुळे जम्मू काश्मीरची दळणवळण यंत्रणा आणकी भक्कम होणार आहे. पर्यटनालाही यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. तंसच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होणार आहे. तर सूरक्षा यंत्रणांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
1st trial train between Sangaldan to Reasi. pic.twitter.com/nPozXzz8HM
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 16, 2024
कुणी म्हणतं हे आश्चर्य आहे... कुणी म्हणतं हे अद्भूत आहे... कुणी म्हणतं अविश्वनीय आहे... कुणासाठी हे स्वप्नवत आहे.. तर कुणासाठी शेकडो किलोमीटरचा वळसा वाचवणारं आहे आणि अमाप संधी उघडणारा राजमार्ग आहे... यातून सगळ्या जगाला भारतीय इंजिनियर्सची अजोड बुद्धिमत्ता दिसलीये. भुगोल आणि विज्ञानाची सगळी सर्व आव्हानं झेलत हा अतिविशाल पूल उभारला जातोय... पॅरीसचा आयफेल टॉवरही त्याच्यापुढे खुजा ठरेल.
1 काश्मीर खोऱ्याला देशाशी रेल्वेनं जोडणारा हा मार्ग आहे. स्थानिकांसाठी अनेक संधी यामुळे खुल्या होणार आहेत.
2 बनिहालदरम्यान रियासी इथं चिनाब नदीवर हा पूल उभारण्यात आला आहे.
3 या पुलाची उंची नदीपासून 359 मीटर आहे.
4 हा पुल कुतुबमीनारच्याही 5 पट अधिक उंच आणि पॅरिसच्या आयफेल टॉवर पेक्षाही 35 मीटर उंच आहे.
5 स्वातंत्र्यानंतर भारतीय रेल्वे (Indian Railway History) च्या इतिहासास हा पूल विज्ञान आणि तंत्रज्ञानांचं उत्तम उदाहरण म्हणून पुढे येणार आहे. प्रोजेक्टमध्ये एकूण 38 टनल आहेत. सर्वात लांब टनल ही 12.75 किलोमीटरची आहेत.
6 ब्रिज बनवण्यासाठी एक खास प्रकारची केबल वापरण्यात आली आहे. ज्याची क्षमता 20 आणि 37 मेट्रीक टन आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 266 किलोमीटर प्रति तासाने जरी वारे वाहत असतील तरी हा पूल हलणार नाही.
7 आयफेल टॉवरपेक्षा उंच आणि इंद्रधनुष्यासारखी कमान असलेला हा पूल जगातलं एक आश्वर्य ठरणार आहे.