मुख्यमंत्री रुपाणी रुग्णालयात, डॉक्टरांनी तब्येतीबद्दल दिली 'ही' बातमी

मुख्यमंत्री रुपाणी यांच्या तब्येतीलबद्दल डॉक्टरांचा अहवाल

Updated: Feb 15, 2021, 03:46 PM IST
मुख्यमंत्री रुपाणी रुग्णालयात, डॉक्टरांनी तब्येतीबद्दल दिली 'ही' बातमी title=

गांधीनगर: गुजरात के मुख्यमंत्री विजय रूपाणी (Vijay Rupani) कोरोना वायरस (Corona Virus) पॉझिटीव्ह आले आहेत. रविवारी एका कार्यक्रमात स्टेजवरुन भाषण देत असताना कोसळले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मुख्यमंत्री रुपाणी यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

वडोदरामध्ये रॅली 

मुख्यमंत्री विजय रूपाणी (Vijay Rupani) रविवारी वडोदरा (Vadodara) च्या निजामपुरामध्ये रॅलीला संबोधित करत होते. त्याचवेळी स्टेजवर बेशुद्ध पडले. मंचावर त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आल्यानंतर ते मंचाच्या पायऱ्या उतरताना दिसले.

मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरमधून वडोदराहून अहमदाबादला नेण्यात आले. युएन मेहता रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. रूपाणी (Vijay Rupani)यांच्या प्रकृतीसंदर्भात रुग्णालयाकडून रात्री उशिरापर्यंत कोणतेही बुलेटिन देण्यात आले नाही. 

खबरदारी म्हणून त्याची कोरोना चाचणीही घेण्यात आली. त्याचा अहवाल सोमवारी आला. ज्यामध्ये त्यांचा रिपोर्ट कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळला.
 
रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, 'विजयभाई रुग्णालयाच्या खोलीत कसलाही आधार न घेता फिरत आहेत. त्यांची ऑक्सिजनची पातळी, ईसीजी, सीटी स्कॅन सामान्य आहे. 

डिहायड्रेशन, थकवा आणि जास्त काम केल्यामुळे त्यांना चक्कर येत होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सीएम रुपाणी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणताही धोका नसल्याचे रुग्णालातून स्पष्ट करण्यात आलंय.