जम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये दोन वेग-वेगळ्या चकमकीत भारतीय जवानांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री रात्री पुलवामाच्या पुचल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.या चकमकीत लष्कर-ए-तोयबा (एलईटी) चे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्याचवेळी पुलवामामध्येच झालेल्या आणखी एका चकमकीत आणखी दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यामुळे सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे.
Jammu & Kashmir | An encounter is underway between terrorists and security forces at Puchal area of Pulwama
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/ANy1M7cjQc
— ANI (@ANI) July 8, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगाम पोलिसांच्या संयुक्त कारवाईत कुलगामच्या जोदर भागात लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, चकमकी दरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याच्या अनेक संधी दिल्या, परंतु दहशतवाद्यांकडून सातत्याने गोळीबार सुरूच ठेवला गेला आणि सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले.
याठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. लपलेल्या दहशतवाद्यांकडून गोळीबारानंतर सुरक्षा दलाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या जवाबी करावाईत दहशतवाद्यांचा खात्मा केला. परिसराला घेराव घालण्यात आला असून या भागात इतर दहशतवादी लपण्याची शक्यता असल्याने शोध मोहीम राबविली जात आहे.