पणजी : देशभरात लॉकडाऊन ५ बाबत चर्चा सुरु झाली आहे. त्यातच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढविण्याची मागणी केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, कोरोनाचा आलेख वाढत आहे, त्यामुळे आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढवण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉकडाऊन ५ मध्ये आणखी काही सूट देण्याची ही मागणी केली आहे. त्यांनी गृहमंत्र्यांकडे तशी मागणी केली आहे. 50 टक्के क्षमता आणि सामाजिक अंतरासह, रेस्टॉरंट सुरू केले पाहिजे आणि बरेच लोकं जिम सुरु करण्याची देशील मागणी करत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपणार आहे. हा टप्पा संपुष्टात येण्यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि पुढे काय करावे, अशी विचारणा केली. त्यांच्यावर आर्थिक व्यवहार सुरु करण्याबाबत आणि इतर समस्यांवर चर्चा झाली.