Union Budget 2022 | राहुल गांधींनी सांगितलं बजेट नेमकं कुणासाठी?

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारचं बजेट (Union Budget 2022) हे दिशाहीन असल्याचं म्हंटलं आहे.  

Updated: Feb 2, 2022, 08:45 PM IST
Union Budget 2022 | राहुल गांधींनी सांगितलं बजेट नेमकं कुणासाठी?  title=

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारचं बजेट (Union Budget 2022) हे दिशाहीन असल्याचं म्हंटलं आहे. बजेटवर दिलेल्या राष्ट्रपतींच्या भाषणांमध्ये आश्वासनांची मोठी यादी होती. सरकारला जे करायचं होतं त्यापैकी सरकार अजूनही काही करु शकलेलं नाही, अशा शब्दात राहुल गांधींनी टीका केली आहे. (congress rahul gandhi critisize central government over to union budget 2022 various point at parliment)

"राष्ट्रपतींचं भाषण हे फक्त एक BUREAUTIC IDEA होतं, यामध्ये कोणतंही व्हीजन नव्हतं. देशाला विकासाच्या दिशेने पुढे कसं न्यायचं, याबाबत भाषणात उल्लेख नव्हता", असं राहुल गांधींनी नमूद केलं.  

जगात दोन भारत

"जगात आता दोन भारत आहेत. एक भारत जो फक्त श्रीमंतांसाठी आहे. तर दुसरा भारत हा त्या गरिबांसाठी आहे, ज्यामध्ये देशाची 90 टक्क्यांहून अधिक लोकं राहतात. या दोन्ही भारतातील दरी वाढत आहे. पण ती दरी भरून काढण्यासाठी सरकार काही प्रयत्न करताना दिसत नाही", अशी टीका राहुल गांधींनी केली.    

तरुण रोजगाराच्या शोधात

देशातील तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. देशातील 3 कोटी युवकांनी 2021 मध्ये रोजगर गमावला. देशात गेल्या 50 वर्षांपेक्षा सर्वात जास्त बेरोजगारी ही आज आहे. अशा भीषण परिस्थितीनंतरही राष्ट्रपतींच्या भाषणात बरोजगारीवर एकही मुद्दा नव्हता. ग्रीन हिंदुस्तानबाबत म्हंटलं जात आहे, पण या ग्रीन हिंदुस्तानकडे रोजगार नाही", असंही गांधींनी नमूद केलं.          

"तुम्ही 'मेक इन इंडियाच्याबह बोलता पण त्यात रोजगार मिळाला नाही. इतकंच नाही ज्यांच्याकडे रोजगार होता त्यांच्यावरही रोजगार गमावण्याची वेळ आली.  हे सत्य सर्वांनाच माहीत आहे. एसएमई क्षेत्रात रोजगार निर्माण होतो. असंघटित क्षेत्रात रोजगार निर्माण होतो पण तुम्ही ही दोन्ही क्षेत्रं संपवली आहेत. तुम्ही जनतेचे लाखो कोटी रुपये हिसकावून तुमच्या जवळच्या अब्जाधीशांना मिळवून दिले", असा घणाघाती आरोपही राहुल गांधींनी केला.