मुंबई : कोरोना व्हायरस जगात चिंतेचा विषय ठरत असताना आता भारतात ही कोरोनाचा धोका वाढला आहे. आज महाराष्ट्रात कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळून आले असून देशात ही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. देशातील अनेक शहरं बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे व्यवहार ठप्प आहेत. किराणा दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि मेडिकल सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतात कोरोेनाचा संसर्ग हा दुसऱ्या टप्प्यात आहे. कोरोनाचा संसर्ग तिसऱ्या टप्प्यात जावू नये म्हणून सरकारचा प्रयत्न आहे. पण देशातून आणि राज्यातून कोरोनाचे वेगवेगळे प्रकरण समोर येत आहेत.
Live Update : नवी मुंबई महानगरपालिकेची परिवहन सेवा रविवारी पूर्ण वेळ बंद राहणार. आज रात्री 12 ते रविवारी रात्री 12 वाजता बस सेवा राहणार बंद.https://t.co/HOK58cBO5u #KOVID19 #coronavirus
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 21, 2020
- अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 ते 24 मार्च दरम्यान जिल्ह्यात लॉक डाउन. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Live Update : रविवारी मुंबईतील मेट्रो सेवा राहणार बंद, @PMOIndia @narendramodi यांच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनानंतर निर्णयhttps://t.co/HOK58cBO5u #KOVID19 #coronavirus #JantaCurfew
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 21, 2020
Live Update : यवतमाळमध्ये 2 परिचारिकांमध्ये आढळली कोरोनाची लक्षणं, दोन्ही परिचारिकांवर उपचार सुरु. नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठवले.https://t.co/HOK58cBO5u #KOVID19 #coronavirus @rajeshtope11 @OfficeofUT
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 21, 2020
ब्रेकिंग : दुबईतून आलेल्या 2 संशयितांना इगतपुरी रेल्वे पोलिसांनी घेतलं ताब्यात, दोघांच्या हातांवर शिक्का असूनही करत होते रेल्वेने प्रवास, मुंबईहून कोलकात्याला निघाले होते संंशयितhttps://t.co/HOK58cBO5u #KOVID19 #coronavirus @rajeshtope11 @OfficeofUT @AUThackeray
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 21, 2020
दुपारी 12.00 वाजता
- अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ओळखपत्र पाहून त्यांनाच केवळ लोकल, बसमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात विचार सुरू - आरोग्यमंत्री
- परिस्थितीची गैरफायदा कुणीही घेवू नये, राष्ट्रीय भावना महत्वाची - आरोग्यमंत्री
- फेज-३ साठी सरकारी, खाजगी, वैद्यकीय कॉलेजमधील बेड, व्हेंटीलेटर तयार, मृत्यूदर कमी, बरे होण्याचे प्रमाण जास्त, त्यामुळं घाबरण्याचे कारण नाही - आरोग्यमंत्री
- ६३ पैकी १४ लोकांना संसर्ग, तर इतर लोकं बाहेरून आलेले आहेत- आरोग्यमंत्री राजेश टोपे
- केंद्रीय आरोग्यमंत्र्याचे मत आहे की, लोकल बंद करायला हव्यात. गर्दी कमी होत नसेल तर लोकल बंद कराव्या लागतील. - राजेश टोपे
- गावी जाण्यासाठी लोकं रेल्वे स्टेशनवर गर्दी करतायंत, त्यामुळे ज्यादा रेल्वे सोडण्याची गरज - आरोग्यमंत्री
- राज्यात आज कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 63 वर. मुंबईत 10 तर पुण्यात 1 रुग्ण आढळला. - आरोग्यमंत्री राजेश टोपे