नवी दिल्ली : सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात.आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकाऱ्याने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी, हे फक्त भारतातच होऊ शकते,असे कॅप्शन लिहले आहे.यामुळे व्हायरल व्हिडिओत नेमकं काय आहे? व IFS अधिकारी असं का म्हणालेत असा प्रश्न अनेकांना पडलाय.
व्हिडिओत काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये गाय चार लहान पिल्लांना दूध पाजताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही पिल्ल गायीची नसुन कुत्रीची पिल्ल आहेत. गायीवर कुत्रीने आपल्या पिल्लांच्या पालन पोषणाची जबाबदारी दिल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुशांत नंदा यांनी हे फक्त भारतातच होऊ शकते,असे कॅप्शन लिहिले आहे.
It can happen only in India.
Cow mothering abandoned pups pic.twitter.com/5QnMZF4RI5— Susanta Nanda IFS (@susantananda3) August 3, 2022
देशात हिंदू धर्मातील लोक गायीचा आदर करून तिला गौ माता संबोधतात. गायीच्या पाया पडतात, आणि पुजाही करतात. एकूणच काय तर तीला देवाचे स्थान दिले जाते.
दरम्यान हा व्हिडिओ 25 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 2 हजारांहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे.