Delhi-Mumbai Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात रस्ते वाहतुकीसंदर्भात बऱ्याच गोष्टी बदलल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तुमहाला माहित आहे का भारतातील सर्वात लांब, ॲडवान्सड (advanced) आणि महागडा एक्स्प्रेस वे (Express Way) लवकरच तयार होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमात दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे चे 70% काम पूर्ण झाले असून, फक्त 30% काम बाकी आहे असे सांगितलेही होते.
मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी तब्बल 20 तास लागतात. पण एकदा या एक्स्प्रेस वे चे काम पूर्ण झाले, तर मुंबई-दिल्लीचा प्रवास अवघ्या 12 तासांत करणे शक्य होणार आहे. दिल्ली-मुंबईचा प्रवास रस्ते मार्गाने केला जाणारा प्रवास 1450 KM इतका आहे. एक्स्प्रेस वेमुळे हे अंतर 1350 किमी पर्यंत कमी होणार आहे. (Delhi-Mumbai Expressway Now Delhi to Mumbai travel is possible in minimum time NZ)
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे हा 1350 किमी लांबीचा असून 8 लेन रुंद असणार आहे. या एक्स्प्रेस वेसाठी 1 लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यापैकी 60,000 कोटी रुपये बांधकामासाठी (Construction) तर 40,000 कोटी रुपये भू-संपादनासाठी (Land Acquisition) खर्च केले जाणार आहेत.
सदर मार्गावर तुम्हाला जागोजागी हॉटेल (Hotel), रेस्टॉरेन्ट (restaurant), पेट्रोल पंप (Petrol pump) आणि टॉयलेट्स (Toilets) यासारख्या सुविधांचा वापर करता येईल. हा एक्स्प्रेस वे महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat), राजस्थान (Rajasthan), मध्यप्रदेश (Madhya Pradesh), हरयाणा (Haryana) आणि दिल्ली (Delhi) या राज्यांना जोडण्याचे काम करणार आहे. या मार्गामुळे लोकांना प्रवास करणे अधिक सुखकर होणार आहे.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे सुरू झाल्यानंतर दररोज 8.76 लाख लिटर इंधनाची बचत होईल तर वर्षाला सुमारे 320 दशलक्ष लिटर पेट्रोलची बचत होणार आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होणार आहे. CO2 उत्सर्जन (CO2 emissions) 850 मिलियन किलोमीटर ने कमी होणर आहे. तब्बल 40 मिलियन झाडे लावण्याइतकी फायद्याची अशी ही आकडेवारी आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या (Ministry of Road Transport) म्हणण्यानुसार, 2023 पर्यंत दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे चे काम पुर्ण होईल.