Diwali Share Trading : दिवाळीच्या मुहूर्तावर करा 5 खात्रीशीर शेअरमध्ये गुंतवणूक; घसघशीत परताव्याची दाट शक्यता

Diwali Share Trading : दिवाळी म्हटलं की, शेअर बाजारात होणारी ट्रेडिंग एक महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा असतो. फक्त भारतातून नाही, तर जगभरातून या ट्रेडिंगची चर्चा होत असते.  

सायली पाटील | Updated: Oct 24, 2024, 09:00 AM IST
Diwali Share Trading : दिवाळीच्या मुहूर्तावर करा 5 खात्रीशीर शेअरमध्ये गुंतवणूक; घसघशीत परताव्याची दाट शक्यता  title=
Diwali picks share market best stock to buy in festive season icici tcs acc auto

Diwali Share Trading : दिवाळीचा सण तोंडावर असतानाच एकिकडे घराघरांमध्ये या सणाची तयारी सुरु झाली असून, दुसरीकडे शेअर बाजारही या खास उत्सवासाठी सज्ज होचताना दिसत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजारात होणारी ट्रेडिंग अर्थात Mahurat Trading 2024 नेमकी कधी आणि कशी पार पडणार याचीच उत्सुकता गुंतवणुकदारांमध्ये पाहायला मिळत आहे. 

यंदाच्या वर्षी 1 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग पार पडणार आहे. यावेळी जाणकारांच्या माहितीनुसार काही शेअर गुंतवणुकदारांना तगडा परतावा मिळवून देणार असल्यामुळं इथंच गुंतवणूक करण्याचा सल्लाही दिला जात आहे. 

हे शेअर कोणते? पाहा...

Bajaj Auto 

दिवाळीसाठी अनेकांच्याच आवडीचा शेअर म्हणजे, बजाज ऑटो. चॉईस ब्रेकिंगनं या शेअरला 12483 चं टार्गेट दिलं असून, ब्रोकरेजच्या मते मीडियम आणि लाँग टर्म गुंतवणुकीत हा शेअर चांगला फायदा मिळवून देऊ शकतो. कंपनीचा एकंदर चढता आलेख पाहता या ऑटो स्टॉकला Buy रेटिंग देण्यात आलं आहे. मंगळवारी हा शेअर 10.415.95 रुपयांवर क्लोजिंग घेणारा शेअर ठरला. 

ACC Cement 

देशातील श्रीमंतांच्या यादीत विराजमान असणाऱ्या आणि अदानी समुहाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या गौतम अदानी यांच्या एसीसी सिमेंट या कंपनीचा शेअर 2795 रुपयांच्या टार्गेट प्राईजसह दिवाळीच्या प्राधान्यस्थानी असणाऱ्या स्टॉकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. कंपनीनं 2028 पर्यंत उत्पादनक्षमतेत वाढ करत 140 मिलियन टन करण्याचं लक्ष्य निर्धारित केलं आहे. ज्यामुळं या कंपनीच्या चढत्या आलेखावर सर्वांचं लक्ष राहील. 

TCS 

देशातील सर्वात जुन्हा व्यावसायिक कुटुंबांपैकी एक असणाऱ्या टाटा समुहापैकीच एक असऱ्या आयटी फर्म टीसीएसच्या शेअरला मंगळवारी 4020 रुपयांची क्लोजिंग मिळाल्यानंतर या शेअरला 4664 रुपयांची ट्रागेट प्राईज मिळाली. ही कंपनी सध्या व्यापाराच्या कक्षा रुंदावण्यावर लक्ष केंद्रीत करत असल्यामुळं महत्त्वपूर्ण गुंतवणुकीवर भर देताना दिसत आहे. 

हेसुद्धा वाचा : हातात AK-47, चेहऱ्यावर सुडाची भावना; J & K मधील हल्लेखोर दहशतवादी CCTV Video त कैद

Bharat Dynamics 

कंपनीचे अनेक प्रोजेक्ट आणि एक्सपोर्ट अर्थात निर्यातीच्या संधी पाहता या शेअरलाही दिवाळीच्या धर्तीवर पसंती मिळताना दिसत आहे. 

HCL 

टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या एचसीएलचा समावेश Diwali Favourite Stocks च्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. डेटा, एआय इंजिनिअरिंग, सॅप मायग्रेशनसह इतर संधींचांही समावेश असल्यामुळं या शेअरमधून गुंतवणुकदारांना चांगल्या परताव्याची संधी असल्याचं गृहित धरलं जात आहे. 

(वरील माहिती सामान्य तर्कावर आधारित असून, गुंतवणुकीआधी शेअर मार्केट तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)