Debit card वरील 16 डिजिट नंबरचा अर्थ तुम्हाला माहित आहे? या नंबरमध्ये काय काय लपलं आहे हे माहित करुन घ्या

सुरक्षितता आणि सोयीसाठी या कार्डमध्ये बर्‍याच प्रकारची माहिती आहे, ही माहिती आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. 

Updated: Jul 27, 2021, 04:22 PM IST
Debit card वरील 16 डिजिट नंबरचा अर्थ तुम्हाला माहित आहे? या नंबरमध्ये काय काय लपलं आहे हे माहित करुन घ्या title=

मुंबई : डेबिट कार्डमुळे (Debit card) सगळ्यांसाठीच बँकिंग सेवा खूप सोपी आणि सरळ झाली आहे. यामुळे ग्राहकांना कधीही आणि कुठूनही पैसे काढणे शक्य झाले आहे. त्याच बरोबर ग्राहकांना आपल्यासोबत कॅश ठेवण्याची गरज नाही ते आपले कार्ड स्वाईप करुन आपले पैसे देऊ शकतात. आपल्या बँक खात्याशी लिंक असलेले हे कार्ड आपल्याला 24X7 पैसे काढण्याची हमी देतो. फक्त याची एकच अट आहे की, आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी त्यामध्ये तेवढे पैसे असणे गरजे आहे.

देय देण्याच्या प्रक्रियेत सुरक्षितता आणि सोयीसाठी या कार्डमध्ये बर्‍याच प्रकारची माहिती आहे, ही माहिती आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, कोणत्या कंपनीने आपले कार्ड जारी केले आहे, आपल्या कार्डवरील 16 अंकी क्रमांकाचा अर्थ काय आहे, सीव्हीव्ही काय आहे इत्यादी आम्ही आज तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देणार ​​आहोत. (Debit card)

आपण या क्रमांकाच्या मदतीने जेव्हा ऑनलाइन पेमेंट करतो तेव्हा पेमेंट सिस्टमला हे नेटवर्क आपल्याला कोणत्या नेटवर्क कंपनीकडून दिले गेले आहे याचा शोध घेते. यासह, हे नंबर आपल्या बँक खात्याबद्दल देखील माहिती देतात. याशिवाय या नंबरच्या मदतीने म्हणजेच पासवर्डमुळे तुमच्या कार्डची सुरक्षाही निश्चित केली जाते. हेच कारण आहे की, जरी कार्ड गहाळ झाले असले तरी आपल्या कार्डमधून कोणीही पैसे काढू शकत नाही.

कार्डवरील या 16 अंकांचा अर्थ काय आहे?

कोणत्याही डेबिट कार्डच्या पुढच्या बाजूला 16-अंकी कोड लिहिलेला असतो. डेबिट कार्डसह (Debit card) ऑनलाईन पेमेंट करतानाही आपल्याला हा नंबर भरावा लागतो. या कार्डावरचे पहिले 6 अंक 'बँक ओळख क्रमांक' आहेत.

यानंतरच्या 10 क्रमांकामध्ये कार्डधारकाचे युनीक खाते क्रमांक असते. आपल्या डेबिट / एटीएम कार्डवरील ग्लोबल होलोग्राम हा एक सुरक्षा होलोग्राम आहे, ज्याची कॉपी करणे फारच अवघड आहे. हा होलोग्राम 3 डी आहे.

तसेच या कार्डवर एक्‍सपायरी डेट देखील लिहिलेली असते, जेणेकरुन ग्राहकांना हे माहित होते की, या ठरावीक तारखेनंतर तुम्ही हे कार्ड व्यवहारासाठी वापरु शकत नाही.

आपल्या कार्डावर छापलेल्या या 16 अंकी क्रमांकाचा अर्थ काय आहे ते जाणून घ्या.

पहिल्या डिजीटचा अर्थ : 16 अंकी कोडच्या पहिला 1 अंक हा कोणत्या इंडस्‍ट्रीने हे कार्ड जारी केले आहे हे दर्शवतो. याला 'मेजर इंडस्ट्री आयडेंटिफायर' (MII)  म्हणतात.  भिन्न उद्योगांसाठी हे भिन्न असते.

1- ISO आणि अन्य इंडस्‍ट्रीज
2 - एअरलाईन्स
3- विमान कंपन्या आणि इतर उद्योग
4 - ट्रॅवल आणि मनोरंजन
5 - बँकिंग आणि वित्त (VISA)
6 - बँकिंग आणि वित्त  (MasterCard)
7 - बँकिंग आणि मर्चेंडायज‍िंग
8 - पेट्रोलियम
9 - टेलिकॉम आणि इतर उद्योग

पहिल्या 6 अंकांचा अर्थ: कोणत्या कंपनीने हे कार्ड जारी केले आहे हे पहिले 6 डिजिटल दर्शवतो. याला ‘इश्‍युअर आयडेंटिफिकेशन नंबर’ (IIN) म्हणतात.

उदा.
MasterCard = 5XXXXX
VISA = 4XXXXX

यानंतर, शेवटचा अंक वगळता, म्हणजे 7 व्या ते 15 व्या अंकांपर्यंत या संख्येचा संबंध बँक खात्याशी जोडलेला असतो. तसा हा बँक खाते क्रमांक नाही, परंतु तो ग्राहकांच्या खात्याशीच जोडला गेला आहे. परंतु यासाठी ग्राहकांना काहीही काळजी करण्याची गरज नाही. या नंबरवरून आपल्या खात्याबद्दल कोणतीही माहिती कोणत्याही व्यक्तीला मिळणार नाही. हे कार्ड जारीकर्त्याद्वारे जारी केले जाते आणि ही एक अनोळखी संख्या आहे. (Debit card)

अंतिम अंकीचा अर्थ : कोणत्याही डेबिट कार्डच्या शेवटच्या अंकाचा अर्थ चेकसम डि़जीट असतो. हा अंक आपला कार्ड वैध आहे की, नाही हे शोधण्यासाठी वापरला जातो.

सीव्हीव्ही क्रमांक कशासाठी वापरला जातो तो कुठे असतो?

ऑनलाईन पेमेंट करताना तुम्हाला सीव्हीव्ही क्रमांकाचीही गरज आहे. हा सीव्हीव्ही क्रमांक तुमच्या कार्डाच्या मागील बाजूस मुद्रित केलेला 3 अंकी क्रमांक आहे.