मुंबई : मुलींच्या सर्वात जवळची आणि आवडीची गोष्ट म्हणजे शॉपिंग करणे. मुलींकडे कितीही कपडे असले तरी त्यांच्यासाठी ते कमीच आहेत. परंतु रोज वापरत असलेल्या कपड्यांध्ये तुम्ही कधी प्लॅस्टीकचा पट्टा पाहिलाय का? सहसा हा पट्टा सगळ्या कपड्यांना येत नाही. पण ठरावीक आणि शक्यतो ब्रँडेड कपड्यांना प्लास्टिकचा तसा पातळ पट्टा असतो. स्ट्रॅप टॉप, गाऊन, टी-शर्ट आणि बॉटम्समध्येही याचा वापर होतो. परंतु याला पाहून तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की हे कशासाठी दिलं जातं? किंवा याचा नेमका वापर काय? तसे पाहाता हे प्लॅस्टिकचे पट्टे फक्त महिलांच्याच कपड्यांमध्ये असतात. पण ते कधी आणि कसे वापरले जातात? आज आम्ही तुम्हाला महिलांच्या कपड्यांमधले या प्लॅस्टिक लूपचे काम काय आहे, हे तुम्हाला सांगणार आहोत.
कपड्यांना हँगरमध्ये अडकवून लटकवता यावे म्हणून आउटफिटला प्लास्टिकचे लूप लावले जातात. याचे कारण असे की, जर तुम्ही कपडे दुमडून त्यांना हँगर्सवर लटकवले तर त्याच्यावर घडी पडते. तर दुसरीकडे, जर तुम्ही त्यांना नेकलाइन किंवा खांद्याच्या भागाद्वारे हॅन्गरमध्ये अडकवून साठवले तर ते त्यांचे फिटिंग खराब करते.
जर तुमच्या आउटफिटवर हेवी वर्क केले गेले असेल, तर साहजिकच तुम्ही तो पोशाख फोल्ड करू शकत नाही. असे केल्यास त्यावर केलेले काम खराब होऊ शकते.
परंतु तुम्ही जेव्हा जड कपडे हँगर्सवर लटकवता तेव्हा ते देखील कठीण होते, अशा परिस्थितीत हे प्लास्टिकचे लूप खूप उपयुक्त ठरतात. या लूपमुळे, हँगरवरील तुमचे कपडे सुरक्षित असतात आणि पडत नाहीत.
आता प्लॅस्टिक लूप कपडे घातल्यावर दिसू नयेत म्हणून काय करावे?
असे बरेच वेळा घडते की, कपडे घातल्यानंतर हे प्लास्टिकचे लूप कधी हाताकडून बाहेर दिसते, तर कधी नेकलाइनच्या बाहेर दिसू लागते. यामुळे तुमचा लुक तर खराब होतोच शिवाय बऱ्याचदा लोकांसमोर तुम्हाला लाजीरवाणं व्हावं लागतं. ज्यामुळे या रबरचं काहीतरी करणं गरजेचं आहे.
जर हा प्लॅस्टिक लूपची थोडा लांब असेल, तर तुम्ही त्याला मागील बाजूने हलकी गाठ बांधू शकता. लक्षात ठेवा की, ही युक्ती तेव्हाच वापरून पाहा जेव्हा तुमच्या आउटफिटची मागील नेकलाइन खोल नसेल. जर नेकलाइन खोल असेल तर लूप दिसू लागतील.
शिवाय डबल सायडेड टेप वापरून तुम्ही हे लूप एका जागी फिक्स करु शकता किंवा ब्रा बेल्टमध्ये देखील त्याला ठीक करू शकता. असे केल्याने, हे लूप कापडाच्या बाहेरून दिसणार नाहीत किंवा त्यांच्यामुळे तुम्हाला अस्वस्थता जाणवणार नाही.
जर तुम्ही हेवी स्लीव्हलेस गाऊन घातला असेल आणि त्यातही हे लूप दिसत असतील, तर तुम्ही सेफ्टी पिनच्या मदतीने ते आउटफिटमध्ये फिक्स करु शकता.
जर तुम्हाला प्लॅस्टिकच्या लूपमुळे ऍलर्जी होत असेल, किंवा खाज येत असेलत, तर त्यांना आउटफिटपासून वेगळे करा.