नवी दिल्ली : भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी नितीन गडकरींची दिल्लीत भेट घेतलीय. नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी थेट दिल्लीला जाऊन गडकरींची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नितीन गडकरींच्या घरी सकाळी दहाच्या सुमाराला खडसेंनी भेट घेतली. खडसे सध्या नाराज आहेत. तसंच त्यांना मंत्रिपदातूनही मुक्त करण्यात आलंय. त्यानंतर गेल्या काही दिवसांत खडसेंनी भाजपवर टीका करत अनेकवेळा घरचा आहेर पक्षाला दिला होता. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठांवर खडसे दिसले होते.
दरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं मंत्रीपदावरून पायउतार झालेले, भाजप नेते एकनाथ खडसेंवर सामनामधून जोरदार टीका करण्यात आलीय. पदर ढळला की हे घडायचंच, अशा मथळ्याखाली सामनामधून खडसेंवर जोरदार प्रहार करण्यात आलेत. अशोक चव्हाण आणि अजित पवार यांची खडसेंना खुली ऑफर आहे. पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच असे खास ठाकरी शैलीतले बाण सामनातून सोडण्यात आलेत.