EPF Alert! EPS खात्याचे नॉमिनेशन बदलण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

EPF Alert जर ईपीएफ सदस्याला सध्याच्या ईपीएफ किंवा एपीएसमधील नामांकन बदलायचे असेल तर, ते सोप्या पद्धतीने करता येते.

Updated: Mar 28, 2022, 08:03 AM IST
EPF Alert! EPS खात्याचे नॉमिनेशन बदलण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स title=

मुंबई : EPF Alert : कर्मचारी भविष्य निधी (EPF)च्या ज्या सदस्यांनी पीएफ किंवा कर्मचारी पेंशन योजनेच्या नॉमिनेशन सिलेक्ट केले होते. त्यांना नामांकन सहजतेने बदलता येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या खातेधारकांना UAN द्वारे ऑनलाइन ई-नामांकन दाखल करण्यास सांगितले आहे.

ईपीएफओने ट्विट केले की, 'एखाद्या EPF सदस्याला सध्याचे EPF किंवा EPS नामांकन बदलायचे असेल तर तो नवीन नामांकनाची नोंदणी करायची असेल तर त्यांना ते करता येणार आहे. नवीन EPF किंवा EPS नावनोंदणी केल्याने मागील नावनोंदणीत बदल होऊ शकतो.

पीएफ नोंदणी कशी बदलावी

पीएफ खात्याचे ई-नामांकन दाखल करण्यासाठी, ईपीएफ सदस्यांनी www.epfindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

तेथे 'सेवा' विभाग आणि 'कर्मचारी' श्रेणीमध्ये वर क्लिक करा. आता तुम्हाला नामांकन बदलता येईल.

ईपीएफ ई-नामांकनाबाबत 

EPF ई-नॉमिनेशन पात्र कुटुंबातील सदस्यांना PF, पेन्शन, कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजनेअंतर्गत (EDLI) चे 7 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळतो.

कोणीही कधीही नॉमिनेशन अपडेट करू शकतो. लग्नानंतर अपडेट आवश्यक आहे.

यासाठी तुम्ही स्वतः कागदपत्रे दाखल करू शकता. कंपनीकडून कोणत्याही कागदपत्रे किंवा मंजुरीची आवश्यकता नाही.