मुंबई : पोलिस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो गुन्हेगारांच्या मुसक्या आळवळणारा खाकी वर्दीतला (Indian Police) रक्षणकर्ता. कडक ऊन असो की मुसळधार पाऊस, बंदोबस्तापासून तपासापर्यंत खाकी वर्दीला पोलीस चोवीस तास सामान्य माणसाच्या रक्षणासाठी झटत असतो. गुन्हे रोखण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या पोलिसांचा आपल्या नेहमीच अभिमान वाटतो. पण तुम्ही विचार केला आहे का? पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकीच का असतो. भारतात कुठेही गेलात तरी पोलिसांच्या वर्दीचा रंग हा खाकीच असतो. केवळ कोलकात्यात पोलिसांच्या वर्दी रंग आजही सफेच आहे. यामागचं कारणही रंजक आहे.
असा झाला वर्दीचा रंग खाकी
पोलिसांच्या खाकी रंगाच्या (Khami Color) वर्दीचा इतिहास इंग्रज काळातला आहे. इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा भारतीय पोलिसांच्या वर्दीचा रंग सफेद होता. पण सफेद रंग लवकर खराब होत असे. त्यामुळे सफेद रंगाच्या वेगवेगळ्या छटा दिसत होत्या. काही पोलिसांचे कपडे एकदम पांढरे शुभ्र तर काही पोलिसांचे कपडे मकळट सफेद असायचे. त्यातच चहा, धुळीमुळी सफेद कपड्यावर डाग लागायचे, यामुळे पोलीस कर्मचारी त्रस्त झाले होत, मळलेले सफेद कपडे दररोज धुवायला लागायचे. याची तक्रार पोलिसांनी वरिष्ठांकडे केली. यानंतर वर्दीचा रंग बदलण्याच विचार सुरु झाला.
त्या काळात कपडे डाय करण्यासाठी चहाच्या पानांचा वापर केला जायचा. चहाच्या पानांमुळे सफेद कपड्यांना वेगळा रंग प्राप्त व्हायचा हा रंग त्यावेळेचे पोलीस अधिकारी हॅरी लँसेडने यांना प्रचंड आवडला. या रंगावर धुळमातीचे डाग खूप कमी प्रमाणात दिसत होते. या रंगाला खाकी असं नाव देण्यात आलं. हा रंग पोलिसांच्या वर्दीसाठी खूपच आकर्षक दिसत होता. हेच कारण पोलिसांच्या गणवेषाचा रंग खाकी होण्यासाठी ठरलं.
1847 साली हॅरी लँसडेन (harry lemsden) यांनी सर्वात आधी खाकी रंगाचा गणवेष परिधान केला. त्यानंतर आर्मी रेजिमेंट आणि पोलीस विभागाने गणवेषासाठी खाकी रंगाचा अधिकृतरित्या स्विकार केला. तेव्हापासून खाकी रंग हा भारतीय पोलिसांची ओळख बनलाय.
कोलकाता पोलिसांची वर्दी पांढरी का?
देशात केवळ कोलकाता पोलिसांच्या गणवेशाचा रंग अजूनही सफेद आहे. गणवेशाचा रंग बदलण्याचा ब्रिटिशांचा निर्णय कोलकाता पोलिसांना मान्य नव्हता. कोलकाता शहर हे समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. त्यामुळे तिथलं हवामान वर्षभर उष्ण आणि दमट असतं. पांढऱ्या रंगामध्ये उष्णता अधिक जाणवत नाही आणि शरीराचं तापमान कमी राखण्यास मदत होते. कोलकाता पोलिसांना काम करता उष्ण वाटू नये म्हणून त्यांच्या गणवेशाचा पांढरा रंग कायम ठेवण्यात आला. कोलकाता पोलीस वगळता पश्चिम बंगाल राज्यातील इतर पोलिसांच्या गणवेशाचा रंगही खाकी आहे.