राजस्थानमध्ये आढळले खनिजाचे साठे

राजस्थानच्या बांसवाडा आणि उदयपूरमध्ये 11.48 कोटी टन सोन्याची खाण सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 10, 2018, 11:02 AM IST
राजस्थानमध्ये आढळले खनिजाचे साठे title=

नवी दिल्ली : राजस्थानच्या बांसवाडा आणि उदयपूरमध्ये 11.48 कोटी टन सोन्याची खाण सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने हा दावा केला आहे. विभागाचे महानिर्देशक एन. कुटुंबा राव यांनी जयपूरमध्ये माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, राजस्थानमध्ये सोन्याचा शोध लागल्याची शक्यता आहे. उदयपूर आमि बांसवाडा जिल्ह्यात भूकिया डगोचामध्ये ही सोन्याची खाण सापडली आहे.

राव यांच्यानुसार राजस्थानमध्ये 2010 पासून आतापर्यंत 8.11 कोटी टन तांब्यांच्या भंडाराचा शोध लागला आहे. यामध्ये तांब्यांची मात्रा 0.38 टक्के आहे. राजस्थानच्या सिरोही जिल्हायीतल देवा का बेडा, सालियों का बेडा आणि बाडमेर जिल्हात खनिजाचा शोध लावला जात आहे.

राजस्थानमध्ये 35.65 कोटी टन शिसे-जस्त यांचं देखील अंश मिळाले आहेत. नागौर, गंगापूर (करोली आणि सवाई माधोपूरमध्ये उत्खनन सुरु आहे. या जिल्ह्यांमध्ये पोटाश आणि ग्लुकोनाइटचे भंडार सापडले तर भारताला आयातवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल.