Gold Price today | आज सोने घसरल्याने ग्राहकांनी साधली संधी; तुम्ही खरेदी केले का?

Gold, Silver Rate Update, 27 May 2021: देशातील दैनंदिन आर्थिक घडामोडींचा सोन्याचा दरांवर परिणाम होतो. 

Updated: May 28, 2021, 03:12 PM IST
Gold Price today | आज सोने घसरल्याने ग्राहकांनी साधली संधी; तुम्ही खरेदी केले का?  title=

मुंबई : Gold, Silver Rate Update, 27 May 2021: देशातील दैनंदिन आर्थिक घडामोडींचा सोन्याचा दरांवर परिणाम होतो. काल सोन्याच्या दरांनी तब्बल 800 रुपये प्रतितोळे इतकी उसळी घेतली होती.  परंतु आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये बऱ्याच चढ-उतारानंतर सोने कालपेक्षा स्वस्त झाले आहे. चांदीच्या दरांमध्येही घसरण नोंदवली गेली आहे.

बुधवारी सोन्याच्या दरांमध्ये चांगली वाढ झाली होती. त्यानंतर थोड्याप्रमाणात नफा वसूली पाहायला मिळाली. सोने 200 रुपये प्रतितोळे घसरल्याचे दिसून आली आहे. MCX मध्ये सोने 48 हजार 780 रुपयांवर ट्रेंड करीत आहे.

मुंबईतील सराफा बाजारातही कालच्या उसळीनंतर आज काही प्रमाणात घसरण नोंदवण्यात आली आहे. तरीही मुंबईतील स्थानिक बाजारपेठांमध्ये सोने 50 हजार रुपये प्रतितोळेपेक्षा जास्त ट्रेड करीत आहे.

मुंबईतील आजच्या सोन्याचा भाव
22 कॅरेट 46,600 रुपये प्रतितोळे (-200)
24 कॅरेट 47,600 रुपये प्रतितोळे (-200)
------------------------------------------
(वरील सोने - चांदीचे भाव जीएसटी आणि अन्य टॅक्स वगळून दिले आहेत, स्थानिक ज्वेलर्सप्रमाणे यात बदल होऊ शकतो.)