मुंबई : सोने खरेदीसाठी भारतीयांना कोणताही मुहूर्ताची आवश्यकता नसते. गुंतवणूकीसाठी म्हणा किंवा दागिन्यांच्यांच्या खरेदीसाठी सोन्याला विशेष पसंती असते. त्यातही सण किंवा लग्नसमारंभांमध्ये सोन्याची मागणी वाढते.
गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आला होता. परंतु लॉकडाऊनमध्येच सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. MCX बाजारात ऑगस्टमध्ये सोन्याच्या किंमती 55 हजाराच्या वर गेल्या होत्या. तर स्थानिक बाजारपेठांमध्ये सोन्याचे भाव 59 ते 60 हजारांच्या आसपास ट्रेड होत होते.
आजही सोन्याच्या भावाने दमदार उसळी घेतली आहे. गेल्या आठवडाभरापासून सोन्याच्या दरांमध्ये स्थिरता पहायला मिळत होती. 21 मे रोजी सोन्याच्या दरात वाढ नोंदवली गेली. त्यानंतर काल म्हणजेच 25 मेपर्यंत सोन्याच्या दरांमध्ये मुंबईत फारसा बदल झाला नसल्याचे दिसून आले आहे.
22 कॅरेट 46,800 प्रतितोळे (+800)
24 कॅरेट 47,800 प्रतितोळे (+800)
केडिया कमोडिटीच्या डायरेक्टर अजय केडिया यांच्या मतानुसार, सोन्यात येत्या काळात तेजी येण्याचे संकेत आहेत. जगभरातील कमी व्याजदरे, कोरोनाच्या बाबतीतील अनिश्चितता, अधिक लिक्विडिटीमुळे महागाईत वाढ, ईटीएफमध्ये खरेदी, केंद्रीय बँकांची सोन्यात खरेदी, डॉलरच्या किंमतीत घसरण, देशांमध्ये जिओ - पॉलिटिकल तणाव इत्यादी कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
-----------------------------------------
(वरील सोने - चांदीचे भाव जीएसटी आणि अन्य टॅक्स वगळून दिले आहेत, स्थानिक ज्वेलर्सप्रमाणे यात बदल होऊ शकतो.)