मुंबई : Gold Silver Price : आंतरराष्ट्रीय किंमतींचा ट्रॅक ठेवला तर आज भारतीय बाजारात सोन्याची किंमतीत वाढ झाली आहे. गुरूवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर वायदा सोन्याची किंमत 0.45 टक्क्यांनी वाढली आहे. सोन्याची किंमत 6 महिन्यांपासून निच्चांक स्तराजवळ होती. सोन्याच्या दराप्रमाणेच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये चांदीच्या किंमतीत 0.17 टक्के वाढ झाली आहे. गेल्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोन्याच्या दरात 0.4 टक्के घसरण झाली आहे. आता चांदी 3.5 टक्के म्हणजे 2000 रुपये प्रति किलोग्रम तुटलं आहे.
जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढले. पण अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे 7-आठवड्यांच्या निच्चांकावर राहिले. बुधवारी, स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी वाढून 1,729.83 डॉलर प्रति झाले. जे सात आठवड्यांच्या निच्चांकी 1,720.49 डॉलरवरून सावरले आहे.
महिन्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी एमसीएक्सवरील फ्युचर्स सोन्याचे भाव वाढले आहेत. ऑक्टोबरमधील सोन्याचा वायदा 204 रुपयांनी वाढून 45,789 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 0.2 टक्क्यांनी वाढून 1,729.83 टक्क्यांवर पोहोचली. त्याचबरोबर डिसेंबर वायदा चांदीचा भाव 101 रुपयांनी वाढून 58,487 रुपये प्रति किलो झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे भाव 0.3 टक्क्यांनी वाढून 21.58 डॉलर प्रति झाले आहे. डॉलर निर्देशांक आज किंचित घसरला, परंतु बुधवारी एका वर्षाच्या उच्चांकावर राहिला, ज्यामुळे इतर चलनांमध्ये खरेदीदारांसाठी सोन्याची किंमत वाढली.
डॉलर निर्देशांक किंचित खाली 94.278 वर आला. गोल्ड ईटीएफ प्रमाणे, आता सिल्व्हर ईटीएफ सादर केले जाईल. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाने (सेबी) देशात चांदीसाठी एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या व्यतिरिक्त, सेबीच्या संचालक मंडळाने म्युच्युअल फंड नियमांमध्ये सुधारणा करून सिल्व्हर ईटीएफ सुरू केले आहे, गोल्ड ईटीएफसाठी विद्यमान नियामक व्यवस्थेच्या धर्तीवर सिल्व्हर ईटीएफ सुरू केले जात आहे.
सेबीने गोल्ड एक्सचेंज उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गोल्ड एक्सचेंजमध्ये सोन्याचा व्यापार इलेक्ट्रॉनिक गोल्डची पावती अर्थात ईजीआर द्वारे केला जाईल. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (EGR) कोणत्याही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा नवीन स्टॉक एक्सचेंजमधून सुरू केली जाईल. सेबीच्या मंजुरीनंतरच हे ठरवले जाईल की ईजीआरची किमान किंमत किती असेल.