मुंबई : MCX वर सोन्याचा दरात 100 रुपये प्रती 10 ग्रॅममध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याचा दर यावेळी 47500 रुपये आहे. सोन्याचा दर या आठवड्यात जवळपास 600 रुपयांनी घसरला आहे. गुरूवारी सोन्याच्या दरात खूप मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. सोन्याच्या दरात खूप मोठे बदल या आठवड्यात झाले आहेत. (Gold Silver Rate Today 23 July 2021 : Gold Prie trading lower and Silver trading in a rangebound )
दिवस सोने (MCX)
सोमवार 48094/10 ग्रॅम
मंगळवार 47876/10 ग्रॅम
बुधवार 47573/10 ग्रॅम
गुरुवार 47634/10 ग्रॅम
शुक्रवार 47525/10 ग्रॅम
दिवस सोने (MCX)
सोमवार 47774/10 ग्रॅम
मंगळवार 47889/10 ग्रॅम
बुधवार 48299/10 ग्रॅम
गुरुवार 48400/10 ग्रॅम
शुक्रवार 48053/10 ग्रॅम
मागील वर्षी, कोरोनाच्या संकटामुळे लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये, एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56191 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. फ्युचर्स एमसीएक्सला आता सोनं प्रति 10 ग्रॅम 47500 रुपयांच्या पातळीवर आहे. म्हणजेच ते अजूनही सुमारे 8700 रुपयांनी स्वस्त होत आहे.
काल चांदीच्या दरात मोठा बदल दिसला. पण शेवटच्या तासात काही खरेदी त्यामध्ये परत आल्या, त्या मुळे ते प्रति किलो 270 रुपये दराने बंद झाले. आज पुन्हा ते खाली जात असल्याचे दिसते. इंट्रा डे मध्ये चांदीच्या फ्युचर्सने 175 रुपयांची डाईव्ह घेतली पण आता या घसरणीतून ती सावरताना दिसत आहे. पण किंमती 67,000 रुपयांच्या वर आहेत.
दिवस चांदी (MCX)
सोमवार 67246/किलो
मंगळवार 66606/किलो
बुधवार 67137/किलो
गुरुवार 67374/किलो
शुक्रवार 67372/किलो
दिवस चांदी (MCX )
सोमवार 69375/किलो
मंगळवार 69081/किलो
बुधवार 69619/किलो
गुरुवार 69681/किलो
शुक्रवार 68319/किलो
चांदीची सर्वोच्च पातळी 79,980 रुपये प्रति किलो आहे. त्या अनुषंगाने चांदी देखील उच्च पातळीवरून सुमारे 12600 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज, चांदीचे जुलै वायदा प्रति किलो 67370 रुपये आहेत.