नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीच्या बैठकीमध्ये नव्या स्लॅबची घोषणा केली आहे. या बैठकीमध्ये जीएसटीअंतर्गत वस्तूंच्या किंमतीवर चर्चा झाली आणि अनेक वस्तूंची किंमत कमी करण्यात आली.
सरकारला जीएसटीच्या या बैठकमध्ये 133 वस्तूंवरील जीएसटी दरांबाबत सल्ला देखील मिळाला होता. ज्यामध्ये 66 वस्तूंवरील टॅक्स कमी करण्यात आला आहे.
- पॅकेट फूड, लोंचं यावर १८ ऐवजी ५ टक्के जीएसटी
- इन्सुलिनवर १५ ऐवजी ५ टक्के जीएसटी
- स्कूल बॅगवर २८ ऐवजी १८ टक्के जीएसटी
- एक्सरसाईज बुकवर १८ ऐवजी १२ टक्के जीएसटी
- कंप्यूटरवर २८ ऐवजी १८ टक्के जीएसटी
- सिनेमाच्या तिकीटवर दोन प्रकारचे जीएसीटी असणार आहे. १०० रुपयाच्या तिकीटवर १८ तर १०० रुपयापेक्षा जास्तच्या तिकीटवर २८ टक्के जीएसटी
- अगरबत्तीवर १२ ऐवजी ५ टक्के जीएसटी
- प्लास्टिक मोतीवर २८ ऐवजी १८ टक्के जीएसटी
- प्लास्टिक टरपोलीन २८ ऐवजी १८ टक्के जीएसटी
- पुस्तकावर १८ ऐवजी १२ टक्के जीएसटी
- रंगीत पुस्तकांवर १२ ऐवजी 0 टक्के जीएसटी
- प्री-कास्ट ठोस पाईपवर २८ ऐवजी १८ टक्के जीएसटी
- कटलरी वस्तूंवर १८ ऐवजी १२ टक्के संशोधित
- ट्रॅक्टरच्या वस्तूंवर २८ ऐवजी १८ टक्के जीएसटी
- प्रिंटरवर २८ ऐवजी १८ टक्के जीएसटी