Har Ghar Tiranga: रतन टाटा आणि आनंद महिंद्रा यांना राष्ट्रध्वज देणाऱ्या 'त्या' महिला कोण?

रतन टाटा आणि आनंद महिंद्रा यांना राष्ट्रध्वज देणाऱ्या महिलेचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

Updated: Aug 14, 2022, 11:36 PM IST
Har Ghar Tiranga: रतन टाटा आणि आनंद महिंद्रा यांना राष्ट्रध्वज देणाऱ्या 'त्या' महिला कोण? title=
(फोटो सौजन्य - @AshwiniVaishnaw)

Har Ghar Tiranga : भारताला सोमवारी स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असून देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे.  हा अमृत महोत्सव घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडून ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga)अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपच्या अनेक संघटना काम करत आहेत.

दरम्यान, एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे फोटो दिग्गज उद्योपती  रतन टाटा (ratan tata) आणि आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांचे आहे. दोन्ही उद्योगपतींचा एका महिलेसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये महिला दोघांना राष्ट्रध्वज देताना दिसत आहे. त्यामुळे आता व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये असलेली महिला कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

दोन्ही उद्योगपतींना राष्ट्रध्वज देणाऱ्या महिला या स्वाती पांडे (swati pandey) आहेत. स्वाती पांडे या मुंबईत पोस्टमास्तर जनरल आहेत. आनंद महिंद्रा यांनीही त्यांच्यासोबतचा फोटो ट्विट केले असून 'हर घर तिरंगा अभियाना'अंतर्गत मुंबईच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे यांच्याकडून तिरंगा स्वीकारणे हा सन्मान असल्याचे म्हटले आहे. 

स्वाती पांडे यांचे फोटो केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही ट्विट केले आहेत. अश्विनी वैष्णव टपाल खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळेच त्याने हे फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान,  या मोहिमेअंतर्गत टपाल विभागाने 10 दिवसांत 1 कोटीहून अधिक राष्ट्रध्वजांची विक्री केली आहे. राष्ट्रध्वजांची टपाल विभागातून अगदी नाममात्र किमतीत दरात विक्री करण्यात येत आहे.

‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत तिरंगा मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. टपाल विभाग 20 इंच रुंद, 30 इंच लांबीचा तिरंगा फक्त 25 रुपयांना देण्यात येत आहे.