मुंबई : आपण बऱ्याचदा चौपाटीवर अनेक कपल्सनां हातात हात घालून चालताना आणि आपलं प्रेम व्यक्त करताना पाहिलं असेल, तर अनेक कपल हे आपल्याला समुद्र किनाऱ्यावर रोमान्स करताना देखील दिसतात. असे म्हटले जाते की, किस करणं किंवा चुंबन घेणं हे प्रेम व्यक्त करण्याची एक प्रतिक्रिया आहे. फक्त जोडीदारच नाहीतर अनेक लोक आपल्या लहान मुलामुलींचे किंवा बहीण-भावाचे चुंबन घेतात. परंतु यामागची त्यांची भावना आणि प्रेम हे वेगळं असतं. परंतु ही क्रिया मात्र प्रेम व्यक्त करण्याचीच असते.
किस हे हातावर, गालावर, डोक्यावर किंवा ओठांवर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. परंतु तुम्हाला माहितीय का, की किस करण्याचे काही फायदे देखील आहेत. जे एका डॉक्टरने सांगितले आहे. जे जाणून तुम्ही हैराण व्हाल.
दररोज किस करणं तोंडाच्या आरोग्यासाठी चांगलं असल्याचा दावा एका डेंटिस्टने केला आहे. वाचा नक्की काय आहेत हे फायदे
आपल्या तोंडाच्या आरोग्याची काळजी म्हणजेच ब्रश करणे आहे. म्हणजे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना अशा दोन वेळेला आपण दात घासतो. यामुळे दात स्वच्छ होतात. तसेच यामुळे तोंडातून दुर्गंधीही येत नाही. परंतु जो फायदा ब्रशिंग केल्याने होतो, तोच फायदा किसिंगमुळेही होतो, असा दावा एका डेंटिस्टने केला आहे. ज्यामुळे दररोज चार मिनिटं किस करण्याचा सल्ला या डॉक्टरने दिला आहे.
दररोज चार मिनिटं किस केल्याने दातांना ब्रश केल्यासारखाच फायदा होतो असं देखील या डॉक्टरनं म्हटलं आहे. स्मूच केल्याने तोंडातील सलाइव्हा प्रोडक्शन म्हणजे लाळेची निर्मिती वाढते आणि तोंडात दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश होतो, असं या डॉक्टरचं म्हणणं आहे.
न्यूज बझ लाइव्हच्या रिपोर्टनुसार ऑर्थोडोन्टिस्ट डॉ. खालिद कसम यांनी सांगितलं, दिवसातून एकदा जवळपास चार मिनिटं किस करायला हवं. यामुळे ब्रश केल्याप्रमाणेच फायदा मिळतो.
किस करण्याचा सर्वात चांगला फायदा असा की तुमच्या तोंडात लाळ बनत राहते. लाळ तुमच्या दातांवरील अॅसिडचा परिणाम कमी करतं, ज्यामुळे तुमचे दात किडण्याची शक्यता खूप कमी होते. तसेच यामुळे ओरल प्लाक बॅक्टेरियांचाही नाश करण्यात मदत होते. दररोज चार मिनिटं किस केलं तर फ्रेश श्वास आणि निरोगी दात देखील मिळतील.
किस करण्याचे इतरही आरोग्यदायी फायदे आहेत. जसे की, तुमची रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते. तुमचा स्ट्रेस कमी होतो, कारण यामुळे लव्ह हार्मोन्स निर्माण होतात. चेहऱ्यावरील मसल्सची एक्सरसाइझही होते ज्यामुळे तुमचा चेहरा तरुण दिसतो.