Holi 2023 : होळी रे होळी, पुरणाची पोळी…असं म्हणत पुराणपोळीवर ताव मारून आपण होळी सणाचा (Holi 2023) आनंद लुटतो. होळी सण अवघ्या काहीच दिवसांवर आला आहे , आतापर्यंत गृहिणींनी किरणाच्या यादीत पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य आणि त्याची यादी एव्हाना करून ठेवली असेल.
होळी म्हटलं की सर्वात आधी येते ती पुरणाची पोळी. गोड, खमंग, लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यावर सोडलेली तुपाची धार अहाहा! आताच तोंडाला पाणी सुटलं ना ?
पण आपल्यापैकी बऱ्याच गृहिणी असतील ज्यांचा पुरणपोळीचा बेत फसतो. आणि मग सगळं हिरमोड होऊन जातो. पण या होळीला असं होऊन चालणार नाही. होळी हा आनंदाचा सण आहे याची सुरवात गोडव्यानेच करायची. या वेळी पुरणपोळीचा (Puranpoli recipe in marathi ) बेत फसणार नाही, याची जबाबदारी आमची ! चला तर मग एकदम परफेक्ट खुसखुशीत मऊसूत आणि खमंग पुरणपोळी कशी बनवायची त्यासाठीच्या काही खास टिप्स जाणून घेऊया. (Holi 2023 5 tips top make soft purnapoli for holi cooking tips in marathi)
जर कोणी पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असेल तर अनेक प्रश्न डोक्यात सुरु होतात. ते म्हणजे पूर्ण पोळी नीट साधेल की नाही ? पुरण व्यवस्थित बनलं जाईल का ? सारण बाहेर तर येणार नाही ना असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात. शिवाय, पुरणपोळीचा बेत म्हणजे वेळ खाऊ काम असं अनेकींना वाटतं. पण तुम्हाला आज अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याने पटकन पुरणपोळीचा बेत जमूनसुद्धा येईल आणि पुरणपोळी उत्तम साधेल. (Holi Special Puran Poli Recipe)
पुरणपोळी मुख्यतः महाराष्ट्रात बनवला जाणारा पदार्थ. पण प्रत्येक ठिकाणी पुरणपोळी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. पद्धत कितीही वेगळी असली तरी, तोंडात टाकल्या बरोबर विरघळली पाहिजे अशीच पुरणपोळी असायला हवी हे मात्र नक्की.
अश्याप्रकारे पुरण तयार होईल. तयार पुरण एका भांड्यात झाकून ठेऊन द्या , आणि कणिक मळायला घ्या.
टीप : पुरण बरोबर झाल्याचा निकष म्हणजे त्यामधे झारा उभा ठेवला तर काही सेकंद तो उभा राहू शकतो. असं झालं की पुरण गॅसवरुन उतरवून गरम असतंनाच पुरणयंत्रातून वाटून घ्यावं.
(video credit - hebbar's kitchen )
टीप : पुरणपोळी मंद किंवा मध्यम आचेवर भाजून घ्या, पोळी भाजल्यावर डब्यात न ठेवता एखाद्या पेपरवर आधी टाका. थंड झाल्यावर डब्ब्यात भरून ठेवा .