IAS Tina Dabi नी स्टेजवर जाताच काय केलं? प्रेक्षकांनी पाहताच...

टीना डाबीचा हा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का...

Updated: Sep 10, 2022, 12:33 PM IST
IAS Tina Dabi नी स्टेजवर जाताच काय केलं? प्रेक्षकांनी पाहताच... title=

मुंबई : IAS अधिकारी टीना डाबी यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. लोक त्यांच्या पदाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्या अनेकदा सोशल मीडियावर सांगतात की त्यांना पुस्तकांची खूप आवड आहे आणि त्यांना लाइफस्टाइलविषयी पुस्तके वाचायला आवडतात. याशिवाय त्यांना गाण्याची देखील आवड असल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. जेव्हा टीना यांना संधी मिळते तेव्हा त्यांना गायला आवडते. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं आहे. यावेळी टीना या दिवंगत गायक केकेचं गाणं गात आहेत. (IAS Tina Dabi Viral Video)

आणखी वाचा : मुलांसोबत Brahmastra सिनेमा पाहणं हृतिकला पडलं महागात, चाहत्याच्या अशा कृत्यामुळे भडकला अभिनेता

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा जुना व्हिडिओ टीना यांनी चार वर्षांपूर्वी 28 जून 2018 रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) मध्ये असताना टीना दाबींनी त्यांच्या ग्रुपसोबत स्टेजवर हा परफॉर्मन्स दिला.

आणखी वाचा : शनिवारी करा शनिदेवात्या 'या' मंत्रांचा जप, सर्व संकट होतील दूर

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : उत्तम अभिनयासाठी काही पण... अमिताभ बच्चन यांनी चक्क खऱ्या सापासोबत केला सीन शूट, खुद्द बिग बींकडून मोठा खुलासा

हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शन दिले की, 'म्युझिकल परफॉर्मन्स @LBSNAA'. या व्हिडिओमध्ये टीना दाबी यांनी हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यांच्या आजूबाजूला असलेले लोक त्यांच्यासोबत 'पल ये है प्यार के पल' गाणं गात परफॉर्म करत आहेत.

Health Tips: तासनतास AC मध्ये राहणाऱ्यांना होऊ शकतात 'हे' भयानक आजार

टीना यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1993 रोजी भोपाळ, मध्य प्रदेश येथे झाला होता. टीना यांचे वडील जसवंत डाबी हे टेलिकॉम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात बीएसएनएलमध्ये महाव्यवस्थापक आहेत. तर त्यांची आई हिमानी डाबी याही भारतीय इंजीनियरिंग सेवेच्या अधिकारी आहेत. जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी नुकत्याच जैसलमेरमध्ये साफ-सफाई करताना दिसल्या. टीना डाबी यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत जैसलमेरमध्ये स्वच्छता मोहीम राबवली होती. टीना डाबींच्या या उपक्रमाचे खूप कौतुक झाले. टीना सोशल मीडियावर जी काही पोस्ट करतात ती लगेच सोशल मीडियावर व्हायरल होते, कारण त्यांचे लाखो चाहते आहेत.