मुंबई: भारतानेही करून दाखवलं आहे. सलग 76 व्या दिवशी कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट दिसत आहे. गेल्या 24 तासांत नव्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिलासादायक आहे. त्यामुळे कोरोना घटतोय हे आता दिसत आहे. त्याच बरोबर सरकारने मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण मोहिमेवरही भर दिला आहे.
कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसत आहे. 76 दिवसांनंतर आज अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या 24 तासांत 62 हजार 597 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. 1452 कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा 2 कोटी 95 लाख 70 हजार 35 वर पोहोचला आहे.
India reports 60,471 new #COVID19 cases (lowest after 75 days), 1,17,525 discharges & 2726 deaths in last 24 hrs, as per Union Health Ministry
Total cases: 2,95,70,881
Total discharges: 2,82,80,472
Death toll: 3,77,031
Active cases: 9,13,378Total Vaccination: 25,90,44,072 pic.twitter.com/tEfl3sfKB3
— ANI (@ANI) June 15, 2021
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं जनजीवन पूर्वपदावर येत असताना महागाईच्या भडक्याचं मोठं आव्हान अर्थव्यवस्थेपुढे उभं राहिलं आहे. मे महिन्यातील घाऊक तसंच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले आहेत.
गेल्या महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर 12.94 टक्क्यांवर झेपावला आहे. निर्देशांक अस्तित्वात आल्यापासूनचा तो सर्वाधिक ठरला आहे. गेल्या वर्षी मेमध्ये तो उणे 3.37 टक्के होता. तर एप्रिल 2021 मध्ये 10.49 टक्के नोंदला गेला होता. यंदा सलग पाचव्या महिन्यात त्यात वाढ झाली. जूनमधील महागाई दर विक्रमी नसला तरी 12 टक्क्यांपर्यंत असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.