नवी दिल्ली : भारतीय डाक म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. उत्तर प्रदेशात ग्रामीण डाक सेवक भर्तीसाठी भारतीय डाकने आवेदन करण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील विभिन्न भागात एकूण ५३१४ पद रिक्त आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ नोव्हेंबर २०१७ आहे. अर्ज करण्यासाठी विशेष माहिती.
संस्थेचे नाव : भारतीय डाक
पद : ग्रामीण डाक सेवक
पदांची संख्या : एकूण ५३१४
जॉब लोकेशन : उत्तर प्रदेश
वेतन : ५२००-२०२०० + ग्रेड पे २०००
वयोमर्यादा : १८-४० वर्ष
योग्यता : १० वी पास, कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक, मान्यता प्राप्त कॉम्प्युटर प्रशिक्षण संस्थेतून कमीत कमी ६० दिवस बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग सर्टिफिकेट असणे आवश्यक.
अर्ज कारणासाठी फी :
जनरल आणि ओबीसी कॅटेगरी असलेल्या उमेदवारांना १०० रुपये भरून अर्ज करावा लागेल.
अर्ज कुठे करावा ?
www.appost.in/gdsonline/ या वेबसाईटवर जावून उमेदवार अर्ज करू शकतात.
महत्त्वाची तारीख :
२९ नोव्हेंबर २०१७ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
कास्ट कॅटेगरीनुसार रिक्त पदे :
जनरल- २७७१ पद
ओबीसी- १४१२ पद
एससी (SC)- ९५५ पद
एसटी (ST)- २६ पद
PH-HH- ५९ पद
PH-OH- ५८ पद
PH-VH- ३३ पद