दिल्ली : काही दिवसांपूर्वी पी.व्ही.सिंधु आणि आता अजुन एका प्रवाशासोबत बेशिस्त वर्तणुक केल्याने पुन्हा 'इंडिगो' वादामध्ये आले आहे.
इंडिगोच्या एअरलाइन्सच्या एका कर्मचार्याचा विनय कटयाल या प्रवाशासोबत भांडण झाले. हा वाद इतका टोकाला गेला की त्यांची एकामेकांशी मारमारी झाला. तेथील सहप्रवाशाने तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विनय कटयाल हे चैन्नईहून आले होते. मात्र त्यांना विमानतळावरील खाजगी बसमध्ये जाण्यास रोखल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाले. व्हिडिओमध्ये इंडिओच्या कर्मचार्याने त्याचा गळा पकडल्याचे दिसत आहे. मात्र वेळीच तेथील इतर करमाचार्यांनी दोघांमधील लढाई मिटवली.
#WATCH: IndiGo staff manhandle a passenger at Delhi's Indira Gandhi International Airport (Note: Strong language) pic.twitter.com/v2ola0YzqC
— ANI (@ANI) November 7, 2017
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 'इंडिगो'ने तात्काळ या प्रकरणी प्रवाशाची माफी मागितली. तसेच त्या कर्माचार्याला बडतर्फ केले जाईल अशी माहिती दिली आहे. सिविल एविएशन मंत्री एजी राजू यांनी इंडिगो कडे या प्रकरणी डीजीसीएकडून रिपोर्ट मागितला आहे.
इंडिगो प्रेसिडेंट आदित्य घोष यांनी प्रवाशाला फोनकडून माफी मागितली.
काही दिवसांपूर्वी ग्राऊंड स्टाफने बॅटमिंटनपटू पी.व्ही सिंधूसोबतही असाच प्रकार केला होता. तो अत्यंत उद्धटपणे बोलत असल्याची तक्रार सिंधूने ट्विटरवरून केली होती.