श्रीनगर: दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपूरा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी स्फोट घडवून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनला लक्ष्य केले. यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले आहेत. उरी येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. पुलवामा जिल्ह्यात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गाजवळ अवंतीपोरा भागातील गोरीपोरा येथे हा हल्ला झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सीआरपीएफच्या जवानांचा ताफा श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात होता. यात दोन हजारांहून अधिक जवानांचा समावेश होता. या मार्गावरील एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी स्फोटकांचा साठा ठेवला होता. सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा जवळ आल्यानंतर दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. आयईडी स्फोटानंतर गोळीबाराचेही आवाज येत होते. जखमींना तत्काळ श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात येत होते. पण १२ जवान वाटेतच शहीद झाले. यानंतर काही जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतीपोरा येथे पाठवण्यात आहे. तसेच जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरु करण्यात आल्याचे समजते.
National Security Advisor Ajit Doval is monitoring the situation in Kashmir post #PulwamaAttack, Senior CRPF officials are briefing him on the situation (file pic) pic.twitter.com/5XDqrSQ6vC
— ANI (@ANI) February 14, 2019
Pakistan backed Jaish-e-Mohammed claims responsibility for Pulwama IED terror attack, in a text message to Kashmiri News Agency GNS. 12 jawans have lost their lives in the attack pic.twitter.com/X98efDjnrS
— ANI (@ANI) February 14, 2019
तत्पूर्वी जैश-ए- मोहम्मदने स्थानिक वृत्तवाहिन्यांना मेसेज करुन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. आयईडी स्फोटके गाडीत लादण्यात आल्याचीही कबुलीही त्यांनी दिली. अदिल अहमद याने हा आत्मघातकी स्फोट घडवून आणला. अदिल हा पुलवामाच्या गुंडी बाग येथील रहिवासी होता.
CRPF Official on Pulwama attack: There were 70 vehicles in the convoy and one of the vehicles came under attack. The convoy was on its way from Jammu to Srinagar. https://t.co/B0SaEEU5wE
— ANI (@ANI) February 14, 2019