मुंबई : उद्या म्हणजेच शनिवारी भाजपचे कर्नाटक मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा न्यायालयात बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले तर ते केवळ अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरतील... अर्थताच, भाजपसाठी हा मोठा धक्का असेल... पण, भाजपमध्ये आणखीन एक मुख्यमंत्री होते ज्यांनी केवळ एका रात्रीसाठी मुख्यमंत्रीपद चाखलं... ते मुख्यमंत्री म्हणजे जगदंबिका पाल... भाजपमध्ये सर्वात कमी दिवसांसाठी मुख्यमंत्री ठरलेले जगदंबिका पाल एकेकाळी काँग्रेसचे नेते होते... सध्या ते डुमरियागंज या मतदार संघातून भाजपचे खासदार आहेत.
उत्तर प्रदेशात अशाच सत्तेच्या खेळात जगदंबिका पाल यांना एका रात्रीसाठी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती. त्याचं झालं असं की, उत्तर प्रदेशातील तत्कालीन राज्यपाल रोमेश भंडारी यांनी २१ फेब्रुवारी १९९८ रोजी तत्कालीन कल्याण सिंह सरकार बरखास्त केलं... त्यानंतर पाल यांनी मुख्यमंत्री बनवण्यात आलं. २३ फेब्रुवारी रोजी हायकोर्टानं कल्याण सिंह सरकारला हिरवा झेंडा दाखवला.
परंतु, यावेळी न्यायालयानं जगदंबिका पाल यांचा मुख्यमंत्री कार्यकाळ 'शून्य' ठरवला... यासाठी त्यांना माजी मुख्यमंत्री मानलं जात नाही.
सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, असा निकाल दिला आहे, दोन-तीन दिवस नाही, तर अवघ्या २४ तासांच्या आत भाजपाला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. आणि जर भाजपाने बहुमत सिद्ध केलं नाही, तर ही संधी काँग्रेस-जेडीएसला द्यावी लागणार आहे. यामुळे आता भाजपाची खरी राजकीय कसोटी लागणार आहे. घोडेबाजार थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने उद्या दुपारी ३ ते ४ वाजेची वेळ ही सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. न्यायालयात सध्या निकालाचं वाचन सुरू आहे.भाजापाचे वकिलांनी मात्र सोमवारपर्यंतची वेळ मागितली होती.