देशातील पहिल्या ट्रान्सजेंडरचं 'पायलट' होण्याचं स्वप्न साकार

सरकारकडून हॅरीचं स्वप्न पूर्ण 

Updated: Oct 12, 2019, 03:48 PM IST
देशातील पहिल्या ट्रान्सजेंडरचं 'पायलट' होण्याचं स्वप्न साकार  title=

मुंबई : देशातील पहिला ट्रान्सजेंडर प्रायवेट पायलट एडम हॅरीचं विमान उडवण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. केरळ सरकारने हॅरीला व्यवसायिक परवानाच्या शिक्षणाकरता 23 लाख रुपये मदतनिधी देण्याचा निर्णय घेतला आहे. एडम हॅरी 20 वर्षांचा आहे. हॅरीची चुक इतकीच आहे की, तो ट्रान्सजेंडर आहे. यामुळे त्याला घरातून बेघर केलं होतं. 

एडम हॅरीकडे खासगी पायलट परवाना आहे. प्रवासी विमान उडवण्याकरता त्याच्याकडे व्यावसायिक परवाना असण्याची गरज आहे. कुटुंबाने घरातून काढून टाकल्यावर त्याच्याकडे या शिक्षणाची फी भरण्याचे देखील पैसे नव्हते. त्याची तीन वर्षांची ट्रेनिंग फी ही 23.3 लाख रुपये इतकी असणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Pilot Adam harry (@pilotadamharry) on

केरळ सरकारने घोषणा केली आहे की, हॅरीची ट्रेनिंग थांबू देणार नाही. केरळ सरकार ट्रेनिंगचा पूर्ण खर्च करणार आहे. आता हॅरी तिरूवंतपुरमच्या राजीव गांधी एविएशन टेक्नॉलॉजी अकॅडमीतून शिक्षण पूर्ण करणार आहे. रूढी परंपरा सांभाळणाऱ्या हॅरीच्या पालकांनी त्याला ट्रान्सजेंडर असल्यामुळे मारहाण देखील केली. त्याला घरात कोंढून ठेवलं होतं. यातून स्वतःची सुटका करण्यासाठी त्याने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sierra papa bravo 

A post shared by Pilot Adam harry (@pilotadamharry) on

एडम हॅरी हा पहिला ट्रान्सजेंडर आहे ज्याला खासगी पायलटचा परवाना मिळणार आहे. एडम हॅरीने राज्याच्या सामाजिक न्याय विभाग आणि त्यांचे सचिव बीजू प्रभाकर यांना आपला संघर्ष सांगितला. त्यांनी हॅरीचा संघर्ष ओळखून त्याला मदत केली. यामुळे हॅरी त्यांचे मनापासून आभार मानतो. जर सरकारने मदत केली नसती तर माझं स्वप्न अर्धवटचं राहिलं असतं.