'या' मंदिरात देवाला वाहतात फक्त दगड!

 भारताला मंदिरांची परंपरा आहे

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 1, 2018, 09:24 PM IST
'या' मंदिरात देवाला वाहतात फक्त दगड! title=

मुंबई : भारताला मंदिरांची परंपरा आहे आणि प्रत्येक मंदीराची आपली एक कहाणी आहे. प्रत्येक मंदिराचे स्थापत्यशास्त्र, कोरीवकाम, कळस, इतिहास वेगळा आणि खास. इतकंच नाही तर देवांच्या कथाही वेगळ्या. पूजेची, नैवेद्याची पद्धत वेगळी. 

आज जाणून घेऊया अशाच एका अनोख्या मंदिराबाबत....

काय आहे वेगळेपण?

हे मंदिर आहे बंगलोरमध्ये. म्हणजे मैसुर-बंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून दोन किलोमीटरवर एक अनोखं मंदिर आहे. खरंतर इतर मंदिरांसारखी मंदिराची रचना नाही. या मंदिरात फुलं हार देवाला वाहिले जात नाही. किंवा नैवेद्यही दाखवला जात नाही. तर इथे चक्क देवाला दगड वाहिले जातात. या मंदिराचं नाव आहे कोटीकाल्लीना काडू बसप्पा मंदिर.

 देवावरच्या श्रद्धेपोटी...

हे शिवाचं मंदिर आहे. येथे लोक आपल्या जमिनीतले दगड घेऊन येतात आणि देवाला वाहतात. या परिसरातील लोक शेतकरी आहेत. देवावरच्या श्रद्धेपोटी ते आपली इच्छा पूर्ण झाल्यावर आपल्या जमिनीतील तीन ते पाच दगड देवाला वाहतात. आता येथे अशा वाहिलेल्या दगडांची रास दिसून येते.