Lawrence Bishnoi shooter Rajan : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) खास शूटर राजन याची हत्या (Rajan Murder Case) करण्यात आली आहे. हरियाणातील यमुनानगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. राजनचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. यमुनानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलाबगढजवळ रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह आढळून आला. या हत्येमागे बंबीहा गँगचा (Bambiha gang) हात असून दहशतवादी गँगस्टर अर्श डल्ला याच्या सुचनेवरून हा कट रचण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे. सध्या हरियाणा पोलीस (Haryana Police) यावर अधिक माहिती घेत आहे.
राजन हा कुरुक्षेत्र येथील रहिवासी होता. गेल्या कित्येक वर्षापासून तो लॅरेन्स बिश्नोई गँगसोबत काम करत असल्याने पोलिसांनी त्याच्यावर नजर होती. या गँगचा तो शार्प शुटर होता. हरियाणातील यमुनानगरमध्ये बंबीहा टोळीच्या गुंडानी आधी राजनवर गोळ्या झाडल्या आणि नंतर जाळून मारल्याची प्राथमिक माहिती हरियाणा पोलिसांनी दिलीये. सध्या पोलिस अधिकाऱ्यांनी यावर अधिकचा तपास सुरू केलाय.
लॉरेन्स बिश्नोईचा शार्प शुटर राजन याच्या हत्येची जबाबदारी बंबीहा टोळीने घेतली आहे. याबाबत फेसबुकवर पोस्ट करण्यात आलीये. गोगामेडी आणि सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही गेम वाजवला असं बंबीहा टोळीने फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे. देवेंद्र बंबीहा नावाच्या एका व्यक्तीच्या पेजवरून ही पोस्ट करण्यात आलीये.
पोस्टमध्ये काय म्हटलंय?
'रात्री कुरुक्षेत्रच्या राजनची हत्या झाली. ही हत्या लकी पटियाल आणि अर्श डल्ला यांच्या सांगण्यावरून झाली. लॉरेन्स आणि विष्णू यांच्या सांगण्यावरून त्यांनी लक्ष्मण देवासी संचौर यांची हत्या केली होती. लॉरेन्सच्या मुलाखतीबाबत हा मोठ्या फुगिरीने सांगत होता. अनेक वर्षांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तुम्ही गोगामेडी आणि सिद्धू मूसवाला यांना मारले. तू स्वतःला खूप रागीट समजतोस, आता आम्ही तुला सांगू शत्रुत्व म्हणजे काय, अशी पोस्ट फेसबूकवर करण्यात आली आहे.