LIC चं लवकरच शेअर बाजारात लिस्टींग! तुम्हाला मिळणार का शेअर? अलोटमेट सूत्र ठरलं

भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ ठरलेल्या एलआयसीच्या आयपीओची अलॉटमेंटसाठीचा फॉर्म्युला ठरलाय. आजपासून शेअर गुंतवणूकदरांच्या डिमॅट खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 

Updated: May 13, 2022, 10:39 AM IST
LIC चं लवकरच शेअर बाजारात लिस्टींग! तुम्हाला मिळणार का शेअर? अलोटमेट सूत्र ठरलं title=

मुंबई : भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ ठरलेल्या एलआयसीच्या आयपीओची अलॉटमेंटसाठीचा फॉर्म्युला ठरलाय. आजपासून शेअर गुंतवणूकदरांच्या डिमॅट खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. येत्या मंगळवारी म्हणजे 17 मे रोजी एलआयसीचा शेअर राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.

त्याआधी ज्यांना ज्यांना शेअरची अलॉटमेंट झाली आहे. त्यांच्या डिमॅट अकाऊंटमध्ये शेअर जमा झालेले असतील. गेल्या आठवड्यात 4 मे पासून एलआयसी आयपीओचा लिलाव सुरु झाला. तो या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 9 मे रोजी संपला. त्यानंतर आज सकाळी म्हणजे 13 मे रोजी अलॉटमेंटचा फॉर्म्युला जाहीर झालाय. 

अलॉटमेंटचा फॉर्म्युला काय आहे?

एलआयसीच्या आयपीओची अलोटमेट झाली असून रिटेल प्रवर्गातील गुंतवणूकदारांनी एका लॉटसाठी अर्ज केला असेल तर त्यांना 15 शेअर मिळतील. पॉलिसी होल्डर कॅटेगरीत अर्ज करणाऱ्यांची मात्र निराशा होणार आहे. पॉलिसी होल्डर कॅटगरीत एका लॉटसाठी अर्ज केला असेल तर अलॉटमेंट मिळण्याची शक्यता जवळपास नाही. पॉलिसी होल्डर कॅटेगरीत सर्वाधिक म्हणजे 210 शेअरसाठी अर्ज केला असेल तर 48 शेअर मिळणार आहेत. ​

सब्रस्क्रिप्शन किती झालं होतं. ?

 आयपीओच्या लिलाव काळात रिटेल कॅटेगरीत 1.99 पट तर पोलिसी होल्डर कॅटगरीत 6.12 पट अर्ज आले होते. त्यामुळेच पॉलिसी होल्डर कॅटगरीत एखाद्या लॉटसाठी अर्ज केलेला असेल तर अलॉटमेंट मिळालेली नाही. 

कधी लिस्ट होणार एलआयसीचा आयपीओ?

पुढील आठवड्यात मंगळवारी 17 मे रोजी एलआयसीचा आयपीओ बाजारात लिस्ट होणार. तुम्ही आयपीओ भरला असले तर त्यासंबधी स्टेटस चेक करण्यासाठी https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या संकेतस्थळाला भेट द्या.