रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली : काँग्रेसमध्ये थोरात-पटोले (Congress Thorat-Patole Controversy) वाद सुरु असतानाच आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नाना पटोलेंनी (Nana Patole) विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता, त्यामुळे मविआ सरकार (Mahavikas Aghadi Government) अस्थिर झालं असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी सरकार कोसळलं नसतं म्हणत पटोलेंवर वडेट्टीवारांनी निशाणा साधलाय.
नाना पटोले यांनी राजीनामा दिला आणि...
त्यावेळेस नाना पटोले यांच्यासारखा एक सशक्त माणूस अध्यक्षपदाच्या खुर्चीवर होते, त्यांनी सभागृह उत्तम रितिने चालवलं, एक अभ्यासून आणि मजबूत अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे बघत होता, अशा वेळेस राजीनामा दिल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आणि सरकारला पायऊतार व्हावं लागलं, असं वडेट्टीवार यांनी म्हटंल. त्यावेळेस अनेकांच्या भावना होत्या की नाना पटोले यांनी राजीनामा द्यायला नको होता. कदाचित सरकार त्यावेयळेस टिकलं असतं अशी भावना अनेकांची होती असंही वडेट्टीवर यांनी सांगितलं.
शिवसेनेकडूनही पटोले टार्गेट
दुसरीकडे शिवसेनेनंही (SS Thackeray Group) पटोले यांना टार्गेट केलं आहे. पटोले अध्यक्षपदावर असते तर मविआ सरकार आज अस्तित्वात असतं असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलंय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामाामधून नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर संकटांची मालिका सुरु झाली, मविआ सरकार कोसळण्यास हे प्रमुख कारण असल्याचा आरोप शिवसेनेने केल आहे.
नाना पटोले यांचा राजीनामा देण्याचा निर्णय शहाणपणाचा निर्णय नव्हता, पटोले अध्यक्ष असते तर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आज निर्माण झालेले अेक पेच प्रसंग टाळता आले असते, असं शिवसेनेने म्हटलंय, तसंच पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणं सोपं झालं असतं, पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी होऊच दिली नाही, त्याचाच फायदा पुढे खोकेबाज आमदार आणि त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीला झाला, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
नाना पटोले यांचा इशारा
दरम्यान, गैरसमज पसरवणं खपवून घेतलं जाणार नाही या शब्दांत नाना पटोलेंनी काँग्रेस नेत्यांना थेट इशाराच दिलाय. काँग्रेसमधल्या वादावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रोखठोक भूमिका मांडलीय. बाहेर बोलणाऱ्यांच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं 15 तारखेच्या बैठकीत देऊ असं ते म्हणालेत.