नवी दिल्ली : Loksabha Election 2019 अवघ्या काही दिवसांवर आगामी नवडणूका येऊन ठेपलेल्या असताना काँग्रेसमागोमाग आता भाजपाकडूनही प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ट्विट करत आगामी निवडणूकांच्या दृष्टीने जनतेला आव्हान करण्यास सुरुवात केली आहे. 'मै भी चौकीदार' अशा घोषवाक्यासह यंदाच्या निवडणुकांच्या रिंगणात भाजप उतरणार असून, त्याविषयीचाच एक व्हिडिओही मोदींनी पोस्ट केला आहे. या व्हिडिओध्ये त्यांनी साऱ्या देशात असणारी भाजपची लाट एकंदर कुठवर पोहोचली आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
जवळपास चार मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये भारताच्या सर्व राज्यांचा आढावा घेण्यात आला असून, प्रगतीपथावर या देशाची वाटचाल नेमकी कशी सुरू आहे, यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. चौकीदार या शब्दावरुन ज्यांची खिल्ली उजडवण्यात आली, त्यांनी याच शब्दाला व्हिडिओच्या आणि आपल्या कामाच्या माध्यमातून कसं सार्थ ठरवलं आहे, हे व्हिडिओतून साकारण्यात आलं आहे.
'स्वच्छ भारत' मोहिम म्हणून नका किंवा मग घरोघरी एलपीजी सिलेंडर पोहोचवण्यासाठी राबवण्यात आलेल्या योजना म्हणू नका. विविध विकासकामांच्या साथीने नव्या भाराताची सुरुवात करत आणि शत्रूच्या हद्दीत जात त्याच शत्रूला ठार करत जी काही किमया करण्यात आली त्याचीच जनतेला या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आठवण करुन देण्यात आली आहे.
Your Chowkidar is standing firm & serving the nation.
But, I am not alone.
Everyone who is fighting corruption, dirt, social evils is a Chowkidar.
Everyone working hard for the progress of India is a Chowkidar.
Today, every Indian is saying-#MainBhiChowkidar
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2019
'मा भारती का लाल हूँ... मै भी चौकीदार हूँ...' असं म्हणत प्रत्येक भारतीयाच्या मनात मोदींच्या कामाविषयी कशा प्रकारची भावना आहे, हे प्रचाराच्या निमित्ताने साकारण्यात आलेल्या या गाण्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरच आता येत्या काळात निवडणुका जसजशा जवळ येता तसतशी प्रचाराची ही अनोखी आणि तितकीच कलात्मक तंत्र खऱ्या अर्थाने साऱ्या देशाला पाहायला मिळणार असंच म्हणावं लागेल.
दरम्यान, एकिकडे काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झालेल्या प्रियांका गांधी यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे मोदीही लोकसभा प्रचाराच्या निमित्ताने थेट जनतेशी संवाद साधण्याला प्राधान्य देणार आहेत. त्यामुळे जनता कोणाला कौल देते हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.