पतंगबाजीसाठी 'येथे' छतही मिळते भाड्याने

आज नववर्षातील पहिला सण आहे.

Updated: Jan 14, 2018, 02:55 PM IST
पतंगबाजीसाठी 'येथे' छतही मिळते भाड्याने  title=

 गुजरात : आज नववर्षातील पहिला सण आहे.

महाराष्ट्रात मकरसंक्रांत तर गुजरातमध्ये हा सण उत्तरायण म्हणून साजरा केला जात आहे. देशभरात या सणादिवशी पतंगबाजीचा खेळ रंगतो. 

 
 पतंगबाजीचा आनंद   

उत्तरायणाची मज्जा पतंगाशिवाय अपुरी आहे. गुजरातमध्ये विविध रंगाच्या, आकाराच्या आणि स्वरूपच्या पतंगांची पर्वणी असते. पण पुरेशी जागा नसलेल्यांसाठी आणि अपघात टाळण्यासाठी काहीजणांनी पतंगबाजीसाठी टेरेस मोकळे करून दिले आहे.  

रेफरन्स आवश्यक  

तुम्हांला एखादं छत पतंगबाजीसाठी  हवे असल्यास तुम्हाला रेफरन्स देणं गरजेचं आहे. त्यानंतर मालक 10 खुर्च्या, वॉशरूम वापरण्याची परवानगी देतो. पूर्वी सणाचा एक भाग असणारी पतंगबाजी आता व्यावसायिक भाग झाली आहे. अशाप्रकारे छत उपलब्ध करून देण्यासाठी 12-15 हजार रूपये घेतले जातात.  

40-50 कोटींची उलाढाल  

 गुजरातमध्ये उत्तरायणाचे औचित्य साधून इंटरनॅशनल काईट फेस्टिवलदेखील आयोजित केला जातो.  दरवर्षी पतंगबाजीतून देशात 625 ते 630  कोटींचे व्यवहार होतात. यंदा हा व्यवहार मागील वर्षाच्या तुलनेत 2.5% अधिक आहे. केवळ अहमदाबादमध्ये 45-50 कोटी रूपयांची उलाढाल होते.