अनंतनागमध्ये दहशतवाद्यांकडून CRPF जवानांवर गोळीबार

दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनागच्या मीर बाजारातील सीआरपीएफ कॅम्पला दहशतवाद्यांनी टार्गेट करून हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी झालाय. 

Updated: Oct 7, 2017, 11:26 PM IST
अनंतनागमध्ये दहशतवाद्यांकडून CRPF जवानांवर गोळीबार  title=

अनंतनाग : दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनागच्या मीर बाजारातील सीआरपीएफ कॅम्पला दहशतवाद्यांनी टार्गेट करून हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी झालाय. 

या हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं या भागाला वेढा घातलाय. सर्च ऑपरेशन सुरू आहे. 

शनिवारी सायंकाळा ५.५० मिनिटांनी एका गाडीतून आलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ६६ बटालियनला आपल्या निशाण्यावर घेतलं. मीर बाजारच्या मालपुरा भागात ही घटना घडली. 

या हल्ल्यात एका सब इन्स्पेक्टरच्या उजव्या हाताला गोळी लागल्यानं ते गंभीर जखमी झालेत. त्यानंतर त्यांना तातडीनं हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. 

उल्लेखनीय म्हणजे, जम्मू-काश्मीरच्या अखनूर भागात गुरुवारी सेनेनं दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला होता. या कारवाईत जवानांनी स्फोटक यंत्र आणि दोन सुरुंग ध्वस्त केले होते.