मुंबई : विधानसभेत आतापर्यंत आपण अनेक घटना पाहिल्या आहेत. कधी आमदार एकमेकांवर धावून जातात. तर कधी सभागृहात गोंधळ घालताना दिसतात. पण कधी आमदार तंबाखू खाताना दिसले नसतील. उत्तर प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपले आहे. पण भाजपच्या 2 आमदारांचे व्हिडिओ समाजवादी पक्षाने शेअर केले आहेत. ज्यामध्ये एक आमदार मोबाईलवर गेम खेळत आहेत तर दुसरे आमदार चक्क तंबाखू खाताना दिसत आहेत. (BJP MLAs playing mobile game, eating tobacco in UP Assembly)
समाजवादी पक्षाने सोशल मीडियावर भाजपच्या दोन आमदारांचा व्हिडिओ जारी केला आहे.
सदन की गरिमा को तार-तार कर रहे भाजपा विधायक!
महोबा से भाजपा विधायक सदन में मोबाइल गेम खेल रहे, झांसी से भाजपा विधायक तंबाकू खा रहे।
इन लोगों के पास जनता के मुद्दों के जवाब हैं नहीं और सदन को मनोरंजन का अड्डा बना रहे।
बेहद निंदनीय एवं शर्मनाक ! pic.twitter.com/j699IxTFkp
— Samajwadi Party (@samajwadiparty) September 24, 2022
ट्विटर आणि फेसबुकवर व्हिडिओ जारी करत समाजवादी पक्षाने लिहिले की, 'भाजप आमदारांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेला कलंक लावला! महोबाचे भाजप आमदार मोबाईल गेम खेळत आहेत, झाशीचे भाजप आमदार तंबाखू खात आहेत. या लोकांकडे लोकांच्या प्रश्नांची उत्तरे नसतात आणि सभागृहाला मनोरंजनाचे ठिकाण म्हणून ठेवतात. अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद!'
— Samajwadi Party (@samajwadiparty) September 24, 2022
समाजवादी पक्षाने विधानसभेच्या कामकाजाचा व्हिडिओ ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केला आहे. सपाच्या म्हणण्यानुसार, महोबा सदरचे भाजप आमदार राकेश गोस्वामी आणि झाशीचे भाजप आमदार रवि कुमार शर्मा यामध्ये दिसत आहेत. व्हिडिओमध्ये राकेश गोस्वामी मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळताना दिसत आहेत. तर दुसरीकडे रवी शर्मा सीटवर बसून टेबलखाली तंबाखू मळताना दिसत आहेत.