नवी दिल्ली : मोदी सरकारने युवकांसाठी एक नवी आकर्षक स्कीम सुरु केली आहे. या योजनांच्या माध्यमातुन तुम्ही चांगली कमाई करु शकता. आता सरकारने युवकांसाठी १८ लाख रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
सरकारकडून मागवण्यात आलेल्या माहितीत तुम्ही पात्र ठरलात तर हे १८ लाख रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात.
सरकारकडून देण्यात येणाऱ्या या १८ लाख रुपयांपैकी पहिलं बक्षीस १० लाख रुपये, दुसरं पाच लाख रुपये आणि तिसरं बक्षीस ३ लाख रुपये आहे. हे बक्षीस जिंकण्यासाठी तुम्हाला एक डिझाईन बनवून ऑनलाईन सेंड करावं लागणार आहे.
ओएनजीसी (ONGC)ने २०१६ या वर्षात १०० कोटी रुपयांचं स्टार्टअप फंड तयार केलं होतं. यानुसार, कंपनी एनर्जी सेक्टरमध्ये युवकांकडून मिळणाऱ्या नव्या आयडिया प्रमोट करत आहे. यंदा कंपनीने सोलर चूल डिझाईन करणाऱ्यांपैकी बेस्ट स्पर्धकाला बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
जर ओनजीसीच्या या योजनेत सहभागी होण्याची तुमची इच्छा असेल तर १ डिसेंबर २०१७ पर्यंत तुम्ही सहभागी होऊ शकता. या स्पर्धेत ओनएनजीसीचे कर्मचारी, त्यांचे जवळील नातेवाईक आणि एक्सपर्ट पॅनलशी संबंधित व्यक्ती सहभागी होऊ शकत नाही.
ओएनजीसीने सोलार चूल डिझाईन तयार करताना ७ गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी सांगितलं आहे. या गोष्टींकजे लक्ष देणाऱ्या स्पर्धकाला प्राथमिकता दिली जाणार आहे. जो स्पर्धक यानुसार डिझाईन तयार करेल त्याची बक्षीस जिंकण्याची शक्यता अधिक आहे.
१२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सोलार गॅस चूलीला खूप आवडण्याची शक्यता आहे. जर तुमची आयडिया सरकारला आवडली तर १० लाख रुपयांचं पहीलं बक्षीस जिंकण्याची शक्यता आहे.
या सोलार चूलीच्या डिझाईनसाठी ओनजीसीकडून काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. ओनजीसीच्या मते, चूल अशी असावी ज्यावर २४ तासात कधीही काम करु शकतो. तसेच याचं उत्पादन शुल्क अधिक नसावं. चूलीवर जेवण बववण्याच्या संबंधित सर्व काम व्हायला हवेत. तसेच ही चूल अशा साहित्यापासून बनवण्यात यावी जे काम झाल्यानंतर डिस्पोज करताना कुठलीही अडचण येता कामा नये.
ज्यावेळी संबंधित वेबसाईटवर तुम्ही फॉर्म A जमा कराल त्यानंतर या फॉर्मला शॉर्टलिस्ट करण्यात येईल. त्यानंतर कंपनीकडून बनवण्यात आलेलं एक्सपर्ट पॅनल तुमच्या आयडियावर विचार करेल. या पॅनलमध्ये चर्चा झाल्यानंतर बेस्ट स्पर्धकाने तयार केलेल्या चूलीचं सादरीकरण एप्रिल महिन्यात करावं लागणार आहे. या स्पर्धेची माहिती तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून वेळोवेळी मिळेल.
जर तुम्ही या स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छूक असात तर https://startup.ongc.co.in या वेबसाईटवर तुम्ही डिझाईन सबमिट करु शकता. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख १ डिसेंबर २०१७ आहे. यासाठी स्पर्धकांना फॉर्म A भरावा लागणार आहे.