तुमच्या रेशनिंग कार्डवर ही माहिती चुकीची असेल, तर तुम्हाला ५ वर्षाची जेल होवू शकते

रेशनिंग कार्ड हे आपले महत्वाचे कागद पत्र आहे. ते तुम्हाला कोणते ही सरकारी कामकाजासाठी सक्तीचे आहे. 

Updated: Jun 5, 2021, 06:33 PM IST
तुमच्या रेशनिंग कार्डवर ही माहिती चुकीची असेल, तर तुम्हाला ५ वर्षाची जेल होवू शकते title=

मुंबई : रेशनिंग कार्ड हे आपले महत्वाचे कागद पत्र आहे. ते तुम्हाला कोणते ही सरकारी कामकाजासाठी सक्तीचे आहे. तसेच शाळा किंवा कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी देखील हे महत्वाचे आहे. त्यामुळे त्याला अत्यंत काळजीपूर्वक सांभाळून आपल्याला ठेवावे लागेल. हे रेशनिंग कार्ड वेगवेगळ्या रंगाचे असतात. ज्यामध्ये नारंगी, पिवळा आणि सफेद रंगाचे कार्ड येतात, कुटूंबाच्या आर्थिक परिस्थितीवर आधारित त्या रेशनिंग कार्ड रंग असतो.

पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या कार्ड धारकांना धान्य विकत घेण्यात सवलती दिल्या आहेत. तर पिवळ्या कार्ड धारकांना म्हणजे दारिद्र्य रेषे खालच्या नागरीकांना  प्रत्येक व्यक्ती मागे 5 किलो तांदूळ आणि गहू; दोन ते तीन रुपयांच्या किमतीत उपलब्ध करुन दिले आहे. तसेच या रेशनिंग कार्डमुळे आणखी अनेक बाबतीत सवलती दिल्या जातात. पंरतु याच सवलतींचा लाभ घेण्यासाठी भारतातील अनेक लोकांनी आपले खोटे किंवा बनावट रेशनिंग कार्ड बनवले आहे.

परंतु तुमचे रेशनिंग कार्ड बनवताना किंवा त्यामध्ये कोणाचे नाव टाकताना खोटे किंवा बनावट कागदपत्र देऊ नका कारण सरकार आता या सगळ्या गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. जर सरकारच्या निदर्शनात आले की, तुम्ही फसवणूक करत आहात, तर तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. तसेच तुम्हाला शिक्षा म्हणून काही रक्कम देखील भरावी लागू शकते.

फूड सिक्योरिटी एक्ट अंतर्गत आता दोषी व्यक्तींना पाच वर्षांसाठी जेल किंवा पैसे भरावे लागतील किंवा त्यांना या दोन्ही ही गोष्टींची शिक्षा होऊ शकते.

तुमच्याकडे रेशनिंग कार्ड नसले, तर तुम्ही ते ऑनलाइन बनवू शकता. रेशनिंग कार्ड ऑनलाईन भरण्यासाठी प्रत्येक राज्याने एक खास वेबसाईट तयार केली आहे. तुमच्या राज्यातील वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे नाव पालकांच्या रेशनिंग कार्डमध्ये समाविष्ट आहे. परंतु 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक स्वतःसाठी स्वतंत्र रेशनिंग कार्डसाठी अर्ज करू शकतात.