सावधान ! कोरोनाबाबत तरुणांनो हा गैरसमज बाळगू नका

भारतामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये आढळली ही गोष्ट... 

Updated: Apr 3, 2020, 05:00 PM IST
सावधान ! कोरोनाबाबत तरुणांनो हा गैरसमज बाळगू नका title=

मुंबई : भारतात कोरोना विषाणू तरुण, नोकरी करणारा आणि कामानिमित्त बाहेर असलेल्या लोकांमध्ये जास्त आढळत आहे. भारतात जे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 60 टक्के लोकं 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत.

आकडेवारीनुसार, 1,801 पुष्टी झालेल्या रुग्णांपैकी 391 म्हणजेच 22 टक्के रुग्ण 30 ते 39 वर्षे वयोगटातील आहेत. 376 म्हणजे 21 टक्के रुग्ण 20 ते 29 वर्षांच्या दरम्यान आहेत, तर 17 टक्के लोकं 40 ते 49 वर्षांच्या दरम्यान आहेत.

चीन आणि इटलीमध्ये मात्र चित्र उलटं आहे. या देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांमध्ये सर्वाधिक रग्ण हे 60 वर्षाच्या वरील आहेत. परंतु भारतात एकूण पुष्टी झालेल्या रुग्णांपैकी 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या रुग्णांपैकी केवळ 19 टक्के आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांपैकी केवळ २ टक्के रुग्ण कोरोना विषाणूमुळे बाधित आहेत.

1 एप्रिलपर्यंत 3 टक्के म्हणजेच 46 प्रकरणे अशी नोंदवली गेली. ज्यात संक्रमित रूग्णाचे वय 10 वर्षांपेक्षा कमी आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की आतापर्यंत तरुण वर्गाला असं वाटत होतं की, कोरोना फक्त वृद्ध व्यक्तींनाच होतो. पण भारतातील आकडेवारी ही वेगळंच सांगत आहे.

अधिक वाचा: कोरोनाबाबत आणखी एका गोष्टीचा खुलासा, पुरुषांनो सावधान !

 

कोरोनाचा धोका कोणालाही कोणाला होऊ शकतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हा होतो. त्यामुळे सध्या तरी कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येणं हाच यावर एकमेव उपाय आहे. प्रत्येकाने सामाजिक अंतर राखले पाहिजे आणि हात स्वच्छ ठेवण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे."

भारतात आतापर्यंत जे रुग्ण आढळले आहे. त्यापैकी 1801 रुग्णांमध्ये 73 टक्के पुरुष तर 27 टक्के महिला आहेत. रग्णांमध्ये 20 ते 29 वयाच्या महिलांचं प्रमाण अधिक आहे. 2 एप्रिलपर्यंत 110 महिलांना याची लागण झाली होती. वृद्ध व्यक्तींच्या मृत्यूचं प्रमाण यात जास्त आहे. पण तरुणांचा मृत्यू होणार नाही असं नाही म्हणता येणार. त्यामुळे प्रत्येकाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

अधिक वाचा: कोरोनाच्या संकाटात गरीबांच्या मदतीसाठी किर्तनकार इंदोरीकर महाराजांची मदत