मुंबई : भारतात कोरोनाचा नव्या प्रकार म्हणजेच ओमायक्रॉनची एन्ट्री झाली आहे. तसेचे कोरोनाची सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहाता देशातील काही भागात कडक निर्बंध लावले गेले आहेत. ज्यामुळे आता सर्वत्र मास्क लावा, सोशल डिस्टंसिंग पाळा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा या गोष्टी पुन्हा एकदा लोकं पाळू लागली आहेत, तसेच सरकार देखील आपल्या हे सगळं करण्यासाठी वेळोवेळी आठवण करुन देत आहेत. सध्या, मास्क लावणे हे कोरोना विषाणूविरूद्ध सगळ्यात महत्वाची ढाल आहे. या व्हायरसमुळे मास्कची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे.
आता कोरोनाचा ओमिक्रॉन प्रकार असो, डेल्टा प्रकार असो किंवा भविष्यात येणारे नवीन प्रकार असोत, ते सर्व आपल्या नाकातून आणि तोंडातून शरीरात प्रवेश करतात. अशा परिस्थितीत, कोरोना विषाणूचा कोणताही प्रकार असो, त्याच्या संरक्षणासाठी आपल्याला काही उपायांची मदत घ्यावी लागेल. त्यामध्ये मास्क सर्वात महत्वाचा आहे.
मास्क घालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे?
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा विषाणू त्याच्या स्रावांसह वातावरणात प्रवेश करतो. अशा स्थितीत त्या भागातून आपण मास्क न लावता निघून गेलो तर, हा विषाणू आपल्या श्वासासोबत शरीरात प्रवेश करू शकतो.
तसेच काही लोकं खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर त्यांचे स्राव तेथेच खाली पडतात. अशा ठिकाणी आपण हात लावला तरी ते किटाणू आपल्या हातावरती बसतात. तर जर आपण तो संक्रमित हात आपल्या चेहऱ्यावर ठेवला तर व्हायरसची लागण होण्याची शक्यता असते.
अशा परिस्थितीत जर आपण N-95 मास्क नीट घातला असेल, तर संसर्ग होण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु यासाठी मास्क नीट घालणे म्हणजे आपले तोंड आणि नाक चांगले झाकलेले असले पाहिजे. याशिवाय, जेव्हाही तुम्ही मास्कला स्पर्श कराल, त्याआधी हात सॅनिटायझरने स्वच्छ करा किंवा हात साबणाने चांगले धुवा. जर तुम्ही मास्क योग्य पद्धतीने लावला आणि तुमच्या हातांच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली, तर तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता नगण्य होते.
कोणता मुखवटा सर्वात प्रभावी आहे?
विविध प्रकारचे कापड, सर्जिकल आणि एन-95 मास्क बाजारात सध्या उपलब्ध आहेत. अलीकडील अभ्यासानुसार, असे समोर आले आहे की, सर्जिकल आणि कापड मास्क 70 टक्के प्रभावी आहेत. वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, थ्री-प्लाय मास्क आणि फिटेड मास्क घालणे हे कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात प्रभावी आहे.
तसचे कपडा आणि सर्जिकल मास्क धुतल्यानंतर त्यांचा प्रभाव कमी होतो आणि ते संक्रमणाची साखळी तोडण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे शक्यतो एन-95 मास्कच वापरा.