Cooking Hacks: भात शिजवण्याची योग्य पद्धत माहित आहे ? जर कुकरमध्ये भात शिजवत असाल तर...

cooking tips: कुकरमध्ये शिजवलेला भात खाल्ल्यानंतर तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. प्रेशर कुकरमध्ये भात शिजवल्याने तांदळाचा स्टार्च टिकून राहतो. (perfect way of cooking rice cooking tips)

Updated: Jan 28, 2023, 07:14 PM IST
Cooking Hacks: भात शिजवण्याची योग्य पद्धत माहित आहे ? जर कुकरमध्ये भात शिजवत असाल तर...  title=

cooking tips: रोजच्या जेवणात जस चपाती असतेच त्या प्रकारे भात सुद्धा असतोच. काही जण असे आहेत ज्यांना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही.  तुम्ही साधारण भात कसा शिजवता . कुकरमध्ये किंवा टोपात बरोबर ? पण तुम्ही कधी हा विचार केलाय का भात  बनवतानासुद्धा बराच विचार केला जातो. कुकरमध्ये की भांड्यात शिजवलेला कोणता भात तुम्हाला जास्त आवडतो असा सहज प्रश्न विचारला जातो. अनेकांना तर टोपात शिजवलेला भात आवडतो. तो भात आपल्याला हवा तसा शिजवून घेता येतो मात्र कुकरचं तसं नसतं. पण कोणता भात आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असा प्रश्न कधी आपल्याला पडलाय का? दोन्ही पद्धतीमधून कोणती पद्धत अधिक जास्त चांगली आरोग्याच्या दृष्टीनं याचा कधी विचार केलाय का? आज आम्ही तुम्हाला याबद्दलच सांगणार आहोत. (perfect way of cooking rice cooking tips) 

आपल्याकडे अनेक ठिकाणी भाताशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं. भात खाणं पोटासाठी चांगलं असतं. भात खाल्ल्यानं लवकर भूक लागत नाही असंही म्हणतात.

भात शिजवण्याच्या जशा दोन पद्धती म्हणजे एक प्रेशर कुकर आणि दुसरी म्हणजे गॅसवर भांड्यात किंवा पातेल्यामध्ये शिजवण्याची पद्धत आहे. दोन्ही पद्धतीने शिजवलेल्या भाताची चवही वेगळी येते. त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम नेमका कसा होतो पाहा.

आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर म्हणजे प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात. याचं कारण म्हणजे जेव्हा (cooking hacks) आपण कुकरमध्ये भात शिजवतो तेव्हा त्यामधून कोणतंही पाणी बाहेर काढून टाकत नाही.

स्टार्च भातामध्ये तसाच राहातो. त्यामुळे कुकरमध्ये शिजवलेला भात खाल्ल्यानंतर तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. प्रेशर कुकरमध्ये भात शिजवल्याने तांदळाचा (rice recipe) स्टार्च टिकून राहतो.

त्यामुळे तांदूळ जास्त काळ पोट भरून ठेवतो आणि दीर्घकाळ भूक लागत नाही. भूक न लागल्याने वजनही नियंत्रित होते. एवढेच नाही, जेव्हा प्रेशर कुकरमध्ये भात शिजवला जातो, तेव्हा तो  (rice recipe) अधिक चांगला शिजतो,

ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत होते. प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात पचवायला कमी कष्ट लागतात. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे प्रेशर कुकरमध्ये भात शिजवणं सोपं आणि कमी वेळेत भात शिजतो. गॅसची बचत होते. पाण्याच्या प्रमाणाचा अंदाज आला की आपला भात अगदी परफेक्ट होतो. हा भात पौष्टिकही असतो. 

(सूचना- ही माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. या माहितीची झी 24 तास कोणतीही पुष्टी करत नाही. या गोष्टी करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)