Petrol-Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमतीत वाढ, एका लीटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

Petrol-Diesel Price Today : देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसत आहेत. परिणामी महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 27, 2023, 09:15 AM IST
Petrol-Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमतीत वाढ, एका लीटरसाठी किती रुपये मोजावे लागणार? title=
Petrol-Diesel Price on 24 April 2023

Petrol-Diesel Price on 24 April 2023 : तुम्ही जर आज गाडीत पेट्रोल (Petrol Rate) भरण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची असेल. कारण महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली आहे. काही भागात पेट्रोलचे दर जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारी तेल कंपनी दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर करतात. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल महागात खरेदी करण्याची वेळ सर्वसामान्यांवर येते. 

महाराष्ट्रातील पेट्रोल -डिझेलचे दर 

अहमदनगरमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी 106.64 रुपये तर डिझेलसाठी 93.15 रुपये मोजावे लागणार आहेत. बीडमध्ये पेट्रोल 107.96 रुपये तर  डिझेल 94.42 रुपये, जळगावमध्ये पेट्रोल 107.64 रुपये तर  डिझेल  94.11 रुपये, कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.45 रुपये तर डिझेल 93.94 रुपये, मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये तर  डिझेल  94.27 रुपये, नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 रुपये तर डिझेल 92.59 रुपये, नाशिकमध्ये पेट्रोल 106.51 रुपये तर डिझेल 93.02 रुपये, पुणेमध्ये पेट्रोल 106.61 रुपये तर डिझेल 93.11 रुपये, ठाणेमध्ये पेट्रोल 105.77 रुपये तर डिझेल 92.27 रुपये मोजावे लागणार आहेत. 

वाचा: अरे देवा! 28 एप्रिलपासून येणार नवं संकट; आधी अवकाळी, आता....

इतर शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये 
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये
  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये 
  • नोएडामध्ये पेट्रोल 96.79 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये 
  • गाझियाबादमध्ये 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये 
  • लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये
  • पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये 
  • पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.