मुंबई : केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भाजपा सरकारला घरचा आहेर दिलाय. इंधन दरवाढीमुळे लोकांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत असल्यामुळे आता पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणायला पाहिजे, असं मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलंय.
इराण, व्हेनेझुएला यांसारख्या तेल उत्पादक देशांनी उत्पादनात वाढ करणार असल्याचे म्हटलं होतं. मात्र, जुलै-ऑगस्ट महिन्याच्या अहवालानुसार, या देशांनी तेल उत्पादनात वाढ केली नसल्याने त्याचा फटका भारतासाऱख्या तेल आयात करणाऱ्या देशांना बसलाय. कारण, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने आंतराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमतीत वाढ झालीय.
आजचे दर
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवे उच्चांक स्थापन करणं सुरूच आहे. सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागलंय. पेट्रोल ३८ पैशांनी तर डिझेल ४७ पैशांनी महागलंय. मुंबईत पेट्रोलसाठी प्रतिलिटर ८७.७७ रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर ७६.९८ रुपये नागरिकांना मोजावे लागतायत.