दीपक भातुसे, मुंबई : देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात येताना काही दिसत नाहीये. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. सकाळी १०.३० वाजता होणार्या या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सहभागी होणार आहेत. देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असतानाच मृत्यूचा आकडाही वाढत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर होणार्या या बैठकीत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आपली मतं व्यक्त करतील. रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याबाबत या बैठकीत चर्चा होणार असून पंतप्रधान प्रत्येक राज्यातील तयारीचाही आढावा घेणार आहेत.
PM Narendra Modi to hold a video conference with Chief Ministers of Andhra Pradesh, Karnataka, Tamil Nadu, West Bengal, Maharashtra, Punjab, Bihar, Gujarat, Telangana, Uttar Pradesh today, to discuss corona related situation. pic.twitter.com/fOXxyK4tb2
— ANI (@ANI) August 11, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगणा, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत.
गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 53,601 नवीन रुग्ण वाढले असून 871 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या आता 22,68,676 वर पोहोचली आहे.