PMSBY | फक्त 12 रुपये आणि 2 लाखांचा विमा, जाणून घ्या अधिक माहिती

आपण या योजनेसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करु शकता.

Updated: Jun 14, 2021, 09:57 PM IST
PMSBY | फक्त 12 रुपये आणि 2 लाखांचा विमा, जाणून घ्या अधिक माहिती  title=

मुंबई : केंद्र सरकारने 2015 मध्ये 3 सामाजिक सुरक्षा योजनांची सुरुवात केली. यापैकी एक म्हणजे (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना. ही एक सरकारी अपघात विमा पॉलिसी (Personal Accident Insurance Scheme) आहे. या विमा पॉलिसी अंतर्गत वर्षभराच्या कालावधीत विमाधारकाला अपघातात मृत्यू किंवा दिव्यांगत्व आल्यास संरक्षण देते. ही विमा योजना दरवर्षी रिन्यू होते. आपण या योजनेसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करु शकता. (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Insurance of Rs 2 lakh on a premium of Rs 12 lakh know details)  

योजने एक फायदे तीन

या योजनेते तीन फायदे आहेत. पहिला फायदा हा अपघाती मृत्यू संबंधात आहे. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास 2 लाखांची रक्कम ही उत्तराधिकाऱ्याला मिळते. तसेच जर अपघातात विमाधारकाला एक डोळा किंवा एक पाय किंवा हात गमवावा लागला तर 1 लाख रुपये मिळतात. ही विमा पॉलिसी 1 जून ते 31 मे या कालावधीसाठी आहे.  

कोण घेऊ शकतो ही पॉलिसी? 

भारतातील प्रत्येक 18 ते 70 वयादरम्यानची व्यक्ती या योजनेला लाभ घेऊ शकते. योजनेचा लाभ घेणाऱ्याकडे बचत खातं असणं आवश्यक आहे. 

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकाला आपल्या संबंधित बॅंकेच्या वेबसाईटवरुन लॉग इन करावे लागेल. त्यानंतर विचारण्यात आलेली आवश्यक माहिती द्यावी लागेल.  या योजनेनुसार दरवर्षी 12 रुपये हे  25 -31 मे दरम्यान कापले जातात. 

संबंधित बातम्या :

Google वर कधीच शोधू नये ही गोष्ट, अन्यथा तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं

मोठा दिलासा, मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट