5G Service : 'या' तारखेपासून 5G सेवेचा शुभारंभ

रिलायन्स जिओने (Reliance Jio 4G) टेलिकॉम सेक्टरमध्ये (Telcom Setor) मोठी क्रांती घडवली.  

Updated: Sep 24, 2022, 10:59 PM IST
5G Service : 'या' तारखेपासून 5G सेवेचा शुभारंभ title=

मुंबई :  रिलायन्स जिओने (Reliance Jio 4G) टेलिकॉम सेक्टरमध्ये (Telcom Setor) मोठी क्रांती घडवली. जिओमुळे अनेक यूझर्सना फास्टेस्ट इंटरनेट स्पीड नुभवता आला. मात्र आता आणखी हायस्पीड इंटरनेट (High Speed) वापरता येणार आहे. ज्याची सर्वांना प्रतिक्षा होती, अखेर तो क्षण आलाय. अवघ्या काही दिवसांनी 5G सेवेचा (5G Service) शुभारंभ होणार आहे. (prime minister narendra modi may be launch 5g network on 1 october 2022)

देशात 1 ऑक्टोबरपासून 5G सेवेचा शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते 5G सेवा लॉन्च होणारंय. यासाठी दिल्लीत पीएम इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन करण्यात आलंय. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल (Bharti Airtel) या टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्या भारतात 5जी सेवा सुरू करणार आहेत. रिलायन्स जिओनं दिवाळीपर्यंत (Diwali 2022) देशातल्या काही प्रमुख शहरांमध्ये 5 सेवा सुरू करणार असल्याचं म्हंटलंय. 

5G सेवा ही क्रांती ठरणार आहे. होलोग्रामच्या माध्यमातून दूरदूरच्या भागात शिक्षण, आरोग्य आणि आपत्कालीन सेवांमध्ये मोठा बदल घडू शकतो.. मग ती दूर-दूरच्या भागातली व्याख्याने असोत किंवा आरोग्य सेवेची माहिती असोत किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो, यातून संपर्क आणि माहितीची देवाणघेवाण सहज करता येणार आहे.